घरमनोरंजनकाश्मीरच्या कलम ३७० वर आधारीत 'मुद्दा ३७० जे अॅंड के'!

काश्मीरच्या कलम ३७० वर आधारीत ‘मुद्दा ३७० जे अॅंड के’!

Subscribe

दिग्दर्शक राकेश सावंत यांचा आगामी चित्रपट 'मुद्दा ३७० जे अॅंड के' चा म्यूझिक लॉंच सोहळा रहेजा कल्बमध्ये पार पडला. या सोहळ्यासाठी चित्रपटाचे सर्व कलाकार देखील उपस्थित होते.

काश्मीरच्या कलम ३७० वर आधारीत आगामी चित्रपट ‘मुद्दा ३७० जे अॅंड के’ १३ डिसेंबर २०१९ रोजी प्रदर्शित होणार असून या चित्रपटातील गाणी नुकतीच लॉंच करण्यात आली. काही दिवसांपूर्वी या चित्रपटातील गाण्यांचा लॉंच सोहळा पार पडला. या सोहळ्याला चित्रपटातील सर्व कलाकार उपस्थित होते. ड्रामा क्विन राखी सावंत हिचा भाऊ राकेश सावंत यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. काश्मीरच्या कलम ३७० वर आधारीत हा पहिलाच चित्रपट असल्याचे म्हटले जाते. या चित्रपटाची कथा काश्मिरी पंडिताविषयी, त्यांच्या वेदना आणि त्यांच्या स्वतःच्या जन्मभूमीत निर्वासित बनलेल्या पीडितांबद्दल आहे.

- Advertisement -

 

अनेक दशकांपासून काश्मीर कलम ३७० आणि ३५ (ए) सारख्या कायद्यांच्या जखमांनी वेढले आहे. परंतु तरीही या सुफियाना काश्मीरने बर्‍याच काळापासून तग धरत आपले अस्तित्व गमावत नाही. कदाचित यामुळेच येथे काश्मिरी पंडित दीनानाथ यांचा मुलगा सूरज आणि मुस्लिम मुलगी अस्मा यांच्या प्रेमाला अमरत्व प्राप्त होते. ही प्रेरणा घेत दिग्दर्शक राकेश सावंत यांनी हा चित्रपट बनवलेला आहे. या चित्रपटात हितेन तेजवानी, मनोज जोशी, जरीना वहाब असे अनेक कलाकार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -