घरमनोरंजनन्यूयॉर्कमध्ये 'मुघल-ए-आझम: द म्युझिकल' शोचे असे झाले प्रमोशन

न्यूयॉर्कमध्ये ‘मुघल-ए-आझम: द म्युझिकल’ शोचे असे झाले प्रमोशन

Subscribe

‘मुघल-ए-आझम’ (Mughal-e-Azam)या चित्रपटातील अभिनेत्री मधुबाला (Madhubala) यांच्यावर चित्ररित झालेले आयकॉनिक गाणे ‘जब प्यार किया तो डरना क्या…’ यावर फ्लॅश मॉबचा (Flash Mob) व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ अमेरिकेतील न्यूयॉर्कमधील ( New York) टाइम्स स्क्वेअरवर मुलींचा एक गट कथक नृत्य करत आहेत. नृत्य करणाऱ्या मुलींनी अनारकली सूट आणि कॅप्समध्ये दिसत आहेत.

जून महिन्यात न्यूयॉर्कमध्ये होणाऱ्या ‘मुघल-ए-आझम: द म्युझिकल’ (Mughal-e-Azam: The Musical) शोच्या प्रमोशनचा हा फ्लॅश मॉब होता. 1960 मध्ये ‘मुघल-ए-आझम’ हा चित्रपट रिलीज झाला होता. या चित्रपटावर हा म्युझिकल शो असून दिग्दर्शित के. आसिफचा माइलस्टोन चित्रपट ‘मुघल-ए-आझम’वर आधारित आहे.

- Advertisement -

‘मुघल-ए-आझम’ चित्रपट आजही लोकांच्या मनात जिंवत

पुढील महिन्यात न्यूयॉर्कमध्ये होणाऱ्या ‘मुघल-ए-आझम: द म्युझिकल’ शोच्या प्रमोशनचा हा फ्लॅश मॉब होता. 1960 मध्ये रिलीज झालेला ‘मुघल-ए-आझम’ या चित्रपटावर आधारित हा म्युझिकल शो आहे. शोचे निर्माते सध्या उत्तर अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत आणि यूएस आणि कॅनडामधील वेगवेगळ्या शहरांमध्ये कार्यक्रम सादर करणार आहेत. या शोच्या माध्यमातून जगभरातील चाहत्यांच्या हृदयात चित्रपट जिवंत ठेवण्याचे निर्मात्यांचे ध्येय आहे.

- Advertisement -

के आसिफ यांना श्रद्धांजली वाहायची आहे

या म्युझिकल शोचे दिग्दर्शन फिरोज अब्बास खान यांनी केले आहे आणि शापूरजी पालोनजी निर्मित असा शो आहे. शोच्या अधिकृत वेबसाईटनुसार, फिरोज अब्बास खान यांना हा चित्रपट पुन्हा तयार करायचा नसून, त्यांच्या संगीतमय शोद्वारे चित्रपटाचे दिग्दर्शक के.के. आसिफ यांना श्रद्धांजली वाहायची असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

मॉडर्न प्लेमध्ये दोन नवीन गाण्याचा समावेश

या आधुनिक नाटकाची ध्वनिफीत आणि बोल मूळ चित्रपटातून घेतलेले असतील पण, त्यात नव्याने संगीतबद्ध केलेली दोन गाणीचाही समावेश करण्यात आला आहे. ‘मुघल-ए-आझम’ची महाकाव्य प्रेमकथा ‘अनारकली’ नावाच्या नाटकावरून प्रेरित होती, हे फार कमी लोकांना माहीत असेल. हे नाटक पाकिस्तानी नाटककार इम्तियाज अली यांनी १९२२ मध्ये लाहोरमध्ये लिहिले होते.

 

‘मुघल-ए-आझम’ 15 वर्षे बॉलिवूडचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट

‘मुघल-ए-आझम’ हा चित्रपट 1960 मध्ये रिलीज झाला. परंतु, हा चित्रपट तयार करण्यास 14 वर्षे लागली. दिग्दर्शक के. आसिफने 1946 मध्ये बॉम्बे टॉकीजमध्ये चंद्र मोहन, डीके सप्रू आणि नर्गिससोबत या चित्रपटाचे शूटिंग सुरू केले होते. पण, चित्रपटाच्या कलाकारांमध्ये बदल करण्यात आला आणि त्यात पृथ्वीराज कपूर, दिलीप कुमार आणि मधुबाला यांना साइन करण्यात आले. त्या काळातील हा सर्वात महागडा आणि सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट होता. तसेच बॉलिवूडमध्ये 15 वर्ष सर्वाधिक कमाई करणारा राहिला आहे.


हेही वाचा – New Parliament : नव्या संसद भवनाच्या उद्घाटनप्रसंगी किंग खानचे हृदयस्पर्शी ट्वीट
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -