हिंदी सिनेसृष्टीतील नावाजलेले मुकेश ऋषी आता मराठी सिनेमात झळकणार आहेत. उंच, धिप्पाड, भारदस्त व्यक्तिमत्व आणि पहाडी आवाज लाभलेल्या मुकेश यांनी आजवर अनेक भूमिका साकारल्या. आजवर त्यांनी खलनायक, पोलिस इन्स्पेक्टर, गँगस्टर, अतिरेकी अशा विविध भूमिका केल्या आहेत. ‘सरफरोश’, ‘घातक’, ‘घायल’, ‘कोई मिल गया’ अशा एका पेक्षा एक हिट झालेल्या सिनेमांमधील मुकेश यांच्या व्यक्तिरेखा खूप गाजल्या. मात्र मुकेश यांची पावलं आता मराठी चित्रपटाच्या दिशेनं वळली आहेत. ‘ट्रकभर स्वप्नं’ या बहुचर्चित सिनेमात मुकेश यांनी महत्त्वाची व्यक्तिरेखा साकारली आहे.
विविध भाषांमधील चित्रपटात साकारला अभिनय
मुकेश ऋषी यांनी आजवर अनेक भाषांमधील चित्रपटात अभिनय केला आहे. तेलुगू, मल्याळम, पंजाबी, तमिळ अशा विविध प्रादेशिक भाषांमधील सिनेमांमध्ये अभिनय केले आहेत. तर आता मराठीत काम करण्याऱ्या मुकेश ऋषीचा हा एक वेगळाच अनुभव प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
‘ट्रकभर स्वप्न’ची ऑफर खरं तर मी यातील व्यक्तिरेखेच्या प्रेमाखातर स्वीकारली. आजवर मी विविध भाषांच्या सिनेमांमध्ये नाना तऱ्हेच्या व्यक्तिरेखा साकारल्या आहेत, पण या सिनेमातील व्यक्तिरेखा खूप वेगळी आहे. हा लोकांना पैसे देतो, पण त्या बदल्यात अपेक्षाही करतो. या निमित्ताने मराठी भाषेचा स्वाद चाखता आला आहे. – मुकेश ऋषी, अभिनेता
वाचा – मकरंद-क्रांतीचा ‘ट्रकभर स्वप्नां’चा प्रवास