घरताज्या घडामोडीKiran Mane : महिला अन् सहकलाकारांचा अपमान, वॉर्निंगनंतरही बेशिस्त वागणुकीमुळे केली हकालपट्टी...

Kiran Mane : महिला अन् सहकलाकारांचा अपमान, वॉर्निंगनंतरही बेशिस्त वागणुकीमुळे केली हकालपट्टी – स्टार प्रवाह

Subscribe

अभिनेते किरण माने यांनी राजकीय पोस्ट केल्याचा आरोप करत त्यांना स्टार प्रवाहवरील ‘मुलगी झाली हो’ या मालिकेतून काढून टाकण्यात आले आहे. या निर्णयाचा चहूबाजूंनी विरोध होत आहे. फक्त मनोरंजनसृष्टीतच नाही तर राजकीय वर्तुळातूनही किरण यांना पाठिंबा मिळत आहे. यासंदर्भात 'मुलगी झाली हो' या मालिकेच्या सेटवरील कलाकारांची टीव्ही 9 या वृत्तवाहिनीने मुलाखत घेतली. यावेळी मालिकेतील सहकलाकारांनी किरण मानेंविरोधात एल्गार पुकारला आहे.

अभिनेते किरण माने यांनी राजकीय पोस्ट केल्याचा आरोप करत त्यांना स्टार प्रवाहवरील ‘मुलगी झाली हो’ या मालिकेतून काढून टाकण्यात आले आहे. या निर्णयाचा अनेक स्तरातून विरोध होत आहे. फक्त मनोरंजनसृष्टीतच नाही तर राजकीय वर्तुळातूनही किरण यांना पाठिंबा मिळत आहे. यासंदर्भात ‘मुलगी झाली हो’ या मालिकेच्या सेटवरील कलाकारांची टीव्ही 9 या वृत्तवाहिनीने मुलाखत घेतली. मात्र, यावेळी मालिकेतील सहकलाकारांनी किरण मानेंविरोधात एल्गार पुकारला आहे. किरण माने यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. याशिवाय या सहकलाकारांनी केलेल्या गंभीर आरोपांबाबत किरण माने यांची आणखी एक फेसबुक पोस्ट सोशलमिडियावर चर्चेत आहे.

मालिकेच्या शूटिंगला विरोध

‘मुलगी झाली हो’ या सेटवर मालिकेच्या पुढच्या भागाची तालिम सुरु आहे. मालिकेच्या शूटिंगला साताऱ्यामधील वाईमध्ये परवानगी नाकारण्यात आली. गुळूंब गावच्या संरपंच स्वाती माने यांनी या मालिकेच्या शूटिंगला मनाई केली.याशिवाय संबंधित वाहिनीलासुद्धा बजावण्यात आले आहे.

- Advertisement -

किरण मानेंच्या वर्तवणुकीमुळे मालिकेतून काढून टाकले – उमा विलास पाटील 

“मुळात राजकीय भूमिका किरण माने यांनी मांडली म्हणून, त्यांना या मालिकेतून काढून टाकलं, ही जे काही त्यांनी स्वत;हून पसरवले आहे,ही बाब मुळात खोटी आहे.मुळात त्यांच्या वर्तवणुकीमुळे प्रोडक्शन हाऊसने त्यांना ह्या मालिकेतून काढले आहे. किरण माने सांगत आहेत की, त्यांना याबाबत काही माहीती नाही मात्र, असे काही नाही. त्यांना यापूर्वी तीन वेळा वॉर्न करण्यात आले आहे. त्यानंतरच चौथ्या वेळी प्रोडक्शन हाऊसने हा निर्णय घेतला आहे”, असे आरोप किरण माने म्हणजेच विलास पाटील यांच्या पत्नीची भूमिका साकारणाऱ्या उमा विलास पाटील (शर्वाणी पिल्लई) यांनी केले आहेत.

माझ्यासोबत किरणने वाईट वागणूक केली नाही,पण…  – सविता मालपेकर 

“माझ्याबरोबर किरण माने कधी त्याने वाईट वागणूक केलेली नाही. पण जे मालिकेतील सहकलाकार आहेत त्यांच्यासोबत सतत टॉनटिंग करुन बोलणे. ‘माझ्यामुळे सिरीयल चालली आहे… मी हिरो आहे सिरियलचा… मी ह्याला काढून टाकेल… मी त्याला काढून टाकेन…’, अशी भाषा सहकलाकारांसाठी वापरणे योग्य नाही”, अशी प्रतिक्रिया या मालिकेत विलास पाटील यांच्या आईची भूमिका करणाऱ्या अभिनेत्री सविता मालपेकर (दमयंती पाटील) यांनी दिली.

- Advertisement -

माझ्या वजनावरुन मला टोमणे मारले – दिव्या पुगांवकर (माऊ)

मुळातंच किरण यांच्याशी फारसं बोलणं व्हायचं नाही.मी सुरुवातीला जेव्हा सेटवर आले तेव्हा, या सिरियलमध्ये मी तुझ्या वडिलांची भूमिका करणार आहे. त्यामुळे सेटवरही आपण असेच राहू..तुझ्यामध्ये मला मुलगी दिसते…सुरुवातीला त्यांचं वागणं व्यवस्थित होतं मात्र त्यानंतरची त्यांची वागणूक बदलत गेली. मी या शोची हिरोईन असल्यामुळे आमचे इंव्हेट असतात किंवा तिथे काही महत्त्वाचं असतं, कदाचित त्यांना हे आवडत नसेल किंवा अजून काही त्यामागे कारण असतील याची मला कल्पना नाही.मात्र, त्यावरुन त्यांची टोमणे मारायला सुरुवात झाली.माझ्या वजनावरुन मला टोमणे मारले. याशिवाय बरेच अपशब्द वापरायचे. स्वत:ला हिरोइन समजते का ? जर प्रोडक्शन हाउस आणि चॅनेलने मला हिरोईन म्हणूव कास्ट केले आहे तर हे विचारणारे तुम्ही कोण?, असा सवाल विचारत मालिकेतील माऊने किरण माने यांच्यावर आरोप केले आहेत.

याशिवाय कोणत्याही परिस्थितीत मालिकेेचे शूटिंग थांबणार नाही असे अभिनेत्री दिव्या पुगांवकरने सांगितले.मात्र,”शरद पवार यांच्याकडे आमची बाजू मांडली आहे.ते नक्कीच आम्हाला न्याय देतील”, असे मुलगी झाली हो या मालिकेतील कलाकारांचे म्हणणे आहे.

मराठीत लोटांगन घालनारे आनी लाळघोटे कलाकार ढीग आहेत – किरण माने

“आपली तुफानी मोहीम पाहून, घाबरुन जाऊन प्राॅडक्शन हाऊसकडून पुढच्या मोठ्या कारस्थानाचा भाग सुरू..
… आज मिडीयावाले सेटवर जाणार आहेत…अनेक कलाकारांवर माझ्याविरोधात बोलण्याची सक्ती केली गेलेली आहे… करुद्या आरोप.. जाऊद्या झाडून.. ते बिचारे ‘पोटार्थी’ हायेत. प्राॅडक्शन हाऊस विरोधात बोलणं त्यांच्या पोटावर पाय आणेल. माझ्यासारखं काढून टाकलं जाईल म्हणून हादरलेत बिचारे… चारेक संघविचारी खरोखर माझ्या विरोधात आहेत.. बाकीच्यांवर मनाविरूद्ध जाऊन माझ्या विरोधात बोलावं लागणार.. तरीही ज्यांच्या पाठीचा कणा मजबूत आहे, ते ‘सत्य’ सांगतीलच !पण दोस्तांनो, असल्या भंपकपणावर इस्वास ठेऊ नका. मराठीत लोटांगन घालनारे आनी लाळघोटे कलाकार ढीग आहेत. त्यांच्यावर किती विश्वास ठेवायचा, हे तुमी ठरवा !मी बी कंबर कसलेली हाय..कच्च्या गुरूचा चेला नाय मी !
तुका म्हणे रणी…नये पाहो परतोनी !!!- किरण माने”, अशी पोस्ट शेअर करत किरण माने यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
किरण माने यांच्या आरोपाबाबत ‘स्टार प्रवाह वाहिनी’चा खुलासा

अभिनेता किरण माने यांच्याविरोधात अनेक स्तरातून पाठिंबा तर काहीजण विरोध करत होते. दरम्यान, या सर्व प्रकरणावर स्टार प्रवाह वाहिनीने आता स्पष्टीकरण देत, किरण माने यांचे आरोप या वाहिनीने फेटाळले आहेत. स्टार प्रवाह वाहिनीने एक परिपत्रक जारी करुन म्हटले की, ‘मुलगी झाली हो’ या मालिकेतील महिला कलाकारांसोबत गैरवर्तन केल्याप्रकरणी किरण माने यांना या मालिकेतून काढून टाकण्यात आले. मालिकेतील अनेक सहकलाकारांनी त्यांच्याविरोधात अनेक तक्रारी केल्या होत्या.त्यामुळे किरण माने यांनी केलेले सर्व आरोप हे खोटे आहेत.

याशिवाय “आम्ही सर्व कलाकार आणि त्यांच्या मतांचा आदर करतो. त्यामुळे इथे प्रत्येक व्यक्तीला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. त्यामुळे आम्ही आमच्या कलाकारांसाठी प्रामुख्याने महिलांना सुरक्षित करण्यासाठी वचनबद्ध आहोत”, असेही स्टार प्रवाह वाहिनीने परिपत्रकात म्हटले आहे.

 


हेही वाचा – Kiran mane : ‘मुलगी झाली हो’ मलिकेचं साताऱ्यातील शूटिंग बंद; गुळुंबु ग्रामपंचायतीचा निर्णय


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -