Kiran Mane: अभिनेते किरण मानेंनी घेतली शरद पवारांची भेट, दीड तास केली चर्चा

'सांकृतिक क्षेत्राची माहिती असलेले, सांस्कृति क्षेत्राची जाण असणारे शरद पवार हे एकमेव नेते आहेत. बुद्धिमान विचारी आणि संयमी नेते आहेत. तटस्थपणे ते सगळं ऐकून घेतात. मी माझी मी माझी बाजू त्यांना सांगितली.

mulgi jhali ho fame vilas aka Kiran Mane met Sharad Pawar
Kiran Mane: अभिनेते किरण मानेंनी घेतली शरद पवारांची भेट, दीड तास केली चर्चा

अभिनेते किरण माने (Kiran Mane ) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar )  यांची मुंबईतील वाय बी चव्हाण सेंटर येथे भेट घेतली. राजकीय भूमिका घेतल्याने त्यांना मुलगी झाली हो या मालिकेतून काढून टाकण्यात आले असा आरोप किरण मानेंनी केला होता. त्याच संदर्भात आपली बाजू मांडण्यासाठी त्यांनी आज शनिवारी शरद पवार यांची भेट घेतली. माझी बाजू मांडण्यासाठी मला एकमेव नेते दिसले ते म्हणजे शरद पवार. मी त्यांना माझी बाजू सांगितली आहे आणि मला आशा आहे यावर ते नक्की तोडगा काढतील, असा विश्वास किरण माने यांनी व्यक्त केला. एबीपी माझाशीचे ते याविषयी बोलत होते.

पवारांनी प्रतिक्रीया दिली नाही 

किरण मानें पुढे म्हणाले, ‘सांकृतिक क्षेत्राची माहिती असलेले, सांस्कृति क्षेत्राची जाण असणारे शरद पवार हे एकमेव नेते आहेत. बुद्धिमान विचारी आणि संयमी नेते आहेत. तटस्थपणे ते सगळं ऐकून घेतात. मी माझी मी माझी बाजू त्यांना सांगितली. मला चॅनेलनी बसवून काय चूक आहे हे सांगितले असते आणि रितसर मला बाहेर काढले असते तर चांगले असते. मात्र अशाप्रकारे मला बाहेर काढणे ही एकप्रकारे झुंडशाही वाटते. मी माझे हे सगळे मुद्दे शरद पवार यांच्याकडे मांडले असून पवार यांनी यावर कोणतीही प्रतिक्रीया दिली नसून त्यांनी केवळ माझे म्हणणे ऐकून घेतले. त्यांनी मला लगेचच न्याय मिळवून द्यावा अशी माझी अपेक्षा नाही. परंतु शरद पवार हे महाराष्ट्रातील एकमेव नेते आहेत ज्यांच्याकडे दाद मागू शकतो’, असे किरण माने यांनी म्हटले.

पवारांनी खोचक प्रश्न विचारले

किरण माने पुढे म्हणाले, ‘शरद पवारांनी माझ्या बाजू ऐकून घेतली मात्र कोणतीही प्रतिक्रीय दिली नाही. कारण ते उथळ प्रतिक्रीया देणारे नाही. सर्व गोष्टी शांतपणे ऐकून तुम्हाला खोचक प्रश्न विचारणारे ते आहेत. त्यांनी मलाही २-३ वेळा खोचक प्रश्न विचारले. यावरुन तुम्ही किती पाण्यात आहात हे ते जोखतात. मी माझी बाजू त्यांच्यासमोर मांडली आहे’.

महिलेने काय तक्रार केलीय मला माहितीच नाही 

किरण माने यांना स्टार प्रवाह वाहिनीकडून त्यांना काढून टाकण्याचे ठोस कारण त्यांना मिळाले नसल्याचे त्यांनी सांगितले. माझ्या विरोधात एका महिलेने तक्रार केल्याचे सांगितले जात आहे. यावर किरण माने म्हणाले, ‘ज्या महिलेने काय तक्रार केली आहे हे मला माहिती नाही. तक्रार गंभीर असले तर त्यांनी पोलीस केस करावी. मात्र तक्रार सौम्य असेल तर ती मला या आधी का सांगितली नाही. सांगितले असेल तर त्यावेळी काय झाले. ज्या महिलेने माझ्या विरोधात चॅनेलकडे तक्रार केली आहे त्याविषयी मला काहीच माहिती नाही. मला चॅनेलमधील एका माणसाकडून ही माहिती मिळाली मात्र चॅनेलकडून मला याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. हे कारण खरे आहे असे मला वाटत नाही’.

‘आता जेव्हा या प्रकरणाविरोधात महाराष्ट्रातून उठाव होत आहे तेव्हा हे कारण पुढे केले आहे. उठाव झाल्याने हे कारण देण्यात आले आहे. एका महिलेचे तक्रार होती तर फार आधी मांडायला पाहिजे होती सगळे माझ्या विरोधात गेले असते. परंतु आता हा उठाव मोठा झालाय आणि सर्व लोकांना माहिती आहे. त्यामुळे हे कारण देण्यात आले आहे’, असे किरण माने यांनी सांगितले.

समीर विद्ध्वांसचा किरण मानेंना पाठींबा 


कोणतीही राजकीय भुमिका घेणं किंवा व्यक्त होणं ही प्रत्येकाची वैयक्तिक बाब आहे. घटनादत्त अधिकार आहे. मत न पटल्यास वैचारिक विरोध होऊच शकतो. पण हक्काचं काम काढून घेणं ही दडपशाही आहे! किरण मानेचं व्यक्त होणं न पटून किंवा तक्रारींवरून त्याला मालिकेतून काढून टाकलं असेल तर हे अन्यायकारकच आहे, अशी प्रतिक्रीय मराठी सिने दिग्दर्शक निर्माते समीर विद्ध्वांस यांनी दिली आहे.


हेही वाचा – अभिनेते किरण मानेंवरील कारवाई व्यावसायिक कारणांमुळे, पॅनोरामा एंटरटेनमेंटचे स्पष्टीकरण