Mumbai cruise drug bust case: ड्रग्जच्या सौदेबाजीसाठी कोड वर्डचा वापर, आर्यनच्या मोबाईलमध्ये धक्कादायक माहिती

Aryan Khan bail plea rejected: जेलमध्ये आर्यन खानचा सकाळी ६ वाजता सुरू होणार दिवस, ७ वाजता नाश्ता...
Aryan Khan bail plea rejected: जेलमध्ये आर्यन खानचा सकाळी ६ वाजता सुरू होणार दिवस, ७ वाजता नाश्ता...

शनिवारी रात्री उशिरा एनसीबीने मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या क्रूझवर धाड टाकली. या धाडीमध्ये मोठ्या प्रमाणात ड्रग्ज जप्त करण्यात आले. तसेच बॉलिवूडचा किंग खानचा मुलगा आर्यन खानसह आठ जणांना ताब्यात घेण्यात आलं. त्यानंतर काल, सोमवारी या क्रूझ ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानसह इतर आरोपींना किला कोर्टात हजर करण्यात आलं. कोर्टाने आर्यन खानसह इतर आठ आरोपींना ७ ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी सुनावण्यात आली आहे. या सुनावणी दरम्यान एनसीबीने अनेक खुलासे केले आहे. आर्यन खानच्या मोबाईलमधून याप्रकरणी नवीन माहिती समोर आल्याचे एनसीबी स्पष्ट केले.

आर्यनाच्या मोबाईलमधील चॅटवरून बरीच माहिती समोर आली आहे. ड्रग्जची देवाण-घेवाण करताना कोड वर्डचा वापर केल्याचे समोर आले आहे. एनसीबीला आर्यनच्या चॅटमधून समजले आहे की, ड्रग्ज खरेदी-विक्रीचे प्लनिंग करत होते आणि या प्रकरणात आंतरराष्ट्रीय कनेक्शन आहे. ड्रग्ज संदर्भातील बातचित कोड वर्डमध्ये होत होती. आर्यनच्या फोनमध्ये अनेक आक्षेपार्ह गोष्टी आढळल्या आहेत. हे सर्वजण सतत ड्रग्ज पेडलरसोबत संपर्कात राहत होते. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एनसीबी आर्यनसह इतर आरोपींच्या कोठडीची मागणी करत होते. त्यानुसार त्यांना ७ ऑक्टोबरपर्यंत कोठडी सुनावली आहे.

दरम्यान आर्यनचे वकील सतीश मानेशिंदे म्हणाले की, ‘आर्यनने पार्टीचे नियोजन करण्यासोबत बातचित केली नव्हती. त्याला तिथे बोलावले होते. आर्यन जवळून ड्रग्ज सापडले नाही आहे. त्यामुळे आर्यन याप्रकरणात सामील आहे हे कसे साध्य होऊ शकते.’ आर्यनला एनडीपीएस अॅक्टच्या कलम २७ अंतर्गत अटक केली गेली आहे. माहितीनुसार, आर्यन खानकडे १३ ग्रॅम कोकेन, ५ ग्रॅम एमडी, २१ ग्रॅम चरस आणि एमडीएमएच्या २२ गोळ्या मिळाल्या आहेत. ज्याची किंमत १ लाख ३३ हजार इतकी आहे.


हेही वाचा – मोहम्मद शमीच्या पत्नीचा टॉपलेस व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल