घरताज्या घडामोडीCruise Drugs Case: आज तिसऱ्यांदा अनन्या पांडेची होणार NCB चौकशी

Cruise Drugs Case: आज तिसऱ्यांदा अनन्या पांडेची होणार NCB चौकशी

Subscribe

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून (NCB) आज क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी अभिनेत्री अनन्या पांडेची पुन्हा चौकशी केली जाणार आहे. (Ananya Pandey summoned by NCB again today) आज तिसऱ्यांदा अनन्या पांडेला एनसीबीच्या चौकशीला सामोर जावे लागणार आहेत. सकाळी ११ वाजता अनन्याला चौकशीसाठी एनसीबी कार्यालयात बोलावण्यात आले आहे. याप्रकरणात अटकेत असलेला शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या व्हॉट्सअॅप चॅटमध्ये नाव समोर आल्यामुळे अनन्याची गुरुवारी दोन तास चौकशी झाली. पण ही चौकशी पूर्ण झाली नसल्यामुळे पुन्हा शुक्रवारी एनसीबीकडून अनन्याची चार तास चौकशी करण्यात आली.

एनसीबी सध्या याप्रकरणाचा अधिक खोलवर जाऊन तपास करत असून आतापर्यंत शाहरुख खानच्या मुलासह २० जणांना अटक केली आहे. या तपासदरम्यान एनसीबीला आर्यन खान आणि अनन्या पांडेमध्ये झालेले व्हॉट्सअॅप चॅट सापडले. त्यामुळे एनसीबीने त्वरित अनन्याला नोटीस पाठवून गुरुवारी २२ ऑक्टोबरला समन्स बजावून दुपारी २ वाजता चौकशीसाठी हजर होण्यास सांगितले होते. त्यानुसार अनन्या वडील चंकी पांडेसोबत एनसीबी कार्यालयात दाखल झाली. एनसीबीने अनन्याचे सर्व इलेक्ट्रोनिक गॅझेट जप्त केले. त्यामध्ये तिचा प्लॅपटॉप आणि मोबाईलचा समावेश आहे.

- Advertisement -

दरम्यान आर्यनच्या व्हॉट्सअॅप चॅटमध्ये अनन्याने गांजा संदर्भात बातचित केल्याचा आरोप लावण्यात आला आहे. या चॅटमध्ये आर्यन गांजा अरेंज करण्याचे बोलत आहे. अनन्याने पहिल्यादिवशी चौकशीत सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. एनसीबीचे उपमहासंचालक अशोक मुथा जैन म्हणाले की, सुरू असलेली प्रक्रिया पुढे नेण्यासाठी अनन्याला आज, सोमवारी पुन्हा चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे.


हेही वाचा – Video: ‘बॉबी देओल मुर्दाबाद’ म्हणत बजरंग दलने ‘आश्रम ३’ वेबसीरिजच्या सेटवर केला हल्ला


Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -