घरक्राइमMumbai Cruise Drugs Case : शाहरुखच्या मुलाला १ दिवसाची एनसीबी कोठडी

Mumbai Cruise Drugs Case : शाहरुखच्या मुलाला १ दिवसाची एनसीबी कोठडी

Subscribe

मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या एका क्रूझवर एनसीबीने धाड टाकत हायप्रोफाईल ड्रग्ज पार्टी उधळून लावली. या प्रकरणी एनसीबीने बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह दोघांना अटक केली आहे. यानंतर आर्यन खानसह दोघांनाही सायंकाळी ७ वाजता मुंबईतील किल्ला कोर्टात हजर करण्यात आले. यावेळी कोर्टाने सुनावणीदरम्यान आर्यन खानला उद्यापर्यंत एनसीबी कोठडी सुनावली आहे. त्यामुळे आर्यनला आजची रात्र एनसीबीच्या कोठडीत काढावी लागणार आहे. याप्रकरणावर उद्या पुन्हा सुनावणी पार पडणार आहे.

एनसीबीने सुनावणीदरम्यान कोर्टाकडे दोन दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती, मात्र कोर्टाने केवळ १ दिवसाच्या कोठडीला परवानगी दिली आहे. त्यामुळे आर्यन खानसह इतर दोघांनाही आजची रात्र एनसीबी कोठडीत घालवावी लागणार आहे.

- Advertisement -

याप्रकरणी आत्तापर्यंत आठ जणांना ताब्यात घेतले आहे. यातील ४ जणांविरोधात एनसीबीकडून सध्या कसून चौकशी सुरु असून त्यांनाही अटक होण्याची शक्यता आहे. एनसीबीने अटक केलेल्या संशयित आरोपींमध्ये आर्यन खानसह मुनमुन धामेचा आणि अरबाज मर्चंट यांचा समावेश आहे. या तिघांना आता वैद्यकीय चाचणीसाठी मुंबईतील जेजे रुग्णालयात नेण्यात आले होते. या वैद्यकीय चाचणीनंतर या तिघांनाही न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी आर्यन खाननच्या बाजूने त्याचे वकील सतीश मानेशिंदे यांनी आपली बाजू मांडली. या सुनावणीदरम्यान एनसीबीने आर्यनसह इतर दोघांना दोन दिवसांची एनसीबी कोठडी देण्याची मागणी केली होती. मात्र आर्यनच्या वकीलांनी यावर आक्षेप घेत एक दिवसीय कोठडीला परवानगी दिली आहे.

- Advertisement -

या प्रकरणात आर्यन खानविरोधात ड्रग्ज सेवन केल्याचे आरोप करण्यात आले आहे. त्यामुळे या तीनही आरोपींना या तीनही संशयित आरोपींविरोधात भारतीय दंड संहितेतील एनडीपीसी कायद्यातील कलम ८ सी, २० बी, २७ आणि ३५ अंतर्गत कारवाई करत अटक करण्यात आली आहे. एनसीबीने शनिवारी रात्री क्रूझवर केल्या कारवाईत आठ जणांना ताब्यात घेतले होते. एनसीबीकडून या सर्वांची सुमारे १६ तास सखोल चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर त्यातील तिघांना संशयित आरोपी म्हणून अटक करण्यात आली आहे. या आरोपींच्या चौकशीदरम्यान त्यांना ज्याने ड्रग्ज पुरववले ते बेलापूर, नवी मुंबई येथे राहत होते अशी माहिती एनसीबीला मिळाली आहे. यानंतर एनसीबीने आता पुढील तपास सुरु केला आहे.

मोठी प्रवेश फी

या पार्टीसाठी तगडी फी वसूल करण्यात आली होती. ज्या जहाजावर ही पार्टी सुरू होती, ते जहाज कॉर्डेलिया क्रूझ कंपनीचे होते. ही पार्टी फॅशन टीव्ही इंडिया आणि दिल्लीच्या मानस्क्रे एक्सपिरियन्स नावाच्या कंपनीने आयोजित केली होती. भर समुद्रात होणार्‍या या पार्टीसाठी 60 हजारांपासून ते 5 लाखांपर्यंतची फी ठेवण्यात आली होती.

हे संस्काराचे फळ तर नाही ना?

आर्यन शाहरूख खान याला ड्रग्स घेतल्याप्रकरणी एनसीबीने अटक केल्यानंतर एक व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली. ही क्लिप सिने अभिनेत्री सिमी गरेवाल यांनी १९९७ साली शाहरूख आणि त्याची पत्नी गौरी यांच्या घेतलेल्या मुलाखतीची आहे. ट्विटर युजर प्रिया कुलकर्णी यांनी ही क्लिप शेअर केली आहे. त्यात गौरी खान मस्करीत सिमी गरेवाल यांना सांगतात की, त्यांचा मुलगा आर्यन हा शाहरूख खानच्या खूप जवळ असून शाहरूख त्याचे आयुष्य उद्ध्वस्त करणार आहे. २७ मिनिटांच्या संभाषणात सिमी गरेवाल शाहरूख खानला प्रश्न विचारतात की, तू आपल्या मुलाचे आयुष्य कसे काय, उद्ध्वस्त करणार आहेस, त्यावर शाहरूख म्हणतो, आर्यन तीन ते चार वर्षांचा असताना मी त्याला सांगितले की, तू मुलींच्या पाठी जा, तुला वाटेल तेव्हढ्या सिगरेट ओढ, ड्रग्स घे, सेक्स कर, वूमनाईज हो… त्यावर गरेवाल विचारतात, जेव्हा तो तीन वर्षांचा होता तेव्हा?.. त्यावर गौरी शाहरूख खान हसतात आणि म्हणतात, हो!.. आर्यनने ते सर्व करावे जे मी नाही केले, असे शाहरूख खान त्यावर हसत हसत उत्तरतो.


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -