सुशांत सिंह राजपूतचा मित्र सिद्धार्थ पिठानीला मुंबई हायकोर्टाकडून जामीन मंजूर

सिद्धार्थ पिठानीच्या जामीनाच्या तीन याचिका कोर्टाकडून फेटाळण्यात आल्या होत्या. त्यानंतर त्याच्या वकीलाने हायकोर्टाकडे मागणी केली

सुशांत सिंह राजपूत मृत्यूनंतर समोर आलेल्या ड्रग्ज प्रकरणातील आणखी एक बातमी समोर आली आहे. सुशांतचा रूममेट आणि मित्र सिद्धार्थ पिठानी सुद्धा या प्रकरणात सहभागी असल्याचं समोर आले होते. सुशांतच्या मृत्यूनंतर एनसीबीने बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये ड्रग्ज कनेक्शन शोधायला सुरूवाते केली होती. या प्रकरणात रिया चक्रवर्ती तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती यांना अटक करण्यात आली होती. तसेच श्रद्धा कपूर, सारा अली खान, अनन्या पांडे, दीपिका पादुकोण, भारती सिंह यांची देखील चौकशी करण्यात आली होती.

सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर समोर आलेल्या ड्रग्ज केसमध्ये सुशांत सिंहचा जवळचा मित्र सिद्धार्थ पिठानीला मुंबई हाटकोर्टाकडून जामीन मिळाला आहे. मागील अनेक दिवसांपासून सिद्धार्थ पिठानी तुरूंगवासात होता. सुशांतच्या मृत्यूनंतर समोर आलेल्या ड्रग्ड केसची सूत्र एनसीबीच्या हाती देण्यात आली होती. त्यावेळी एनसीबीला त्यांच्या शोधामध्ये सिद्धार्थ पिठानी विरोधात काही पुरावे सापडले होते. २८ मे २०२१ मध्ये सिद्धार्थ पिठानीला अटक करण्यात आलं होतं.

सिद्धार्थ पिठानीच्या जामीनाच्या तीन याचिका कोर्टाकडून फेटाळण्यात आल्या होत्या. त्यानंतर त्याच्या वकीलाने हायकोर्टाकडे मागणी केली. या याचिकेमध्ये सिद्धार्थ पिठानी कोणत्याही मादक पदार्थांच्या अवैध तस्करीमध्ये सहभागी असल्याचा पुरावा सापडला नसल्याचे सांगण्यात आले.

तसेच एनसीबीकडून सांगण्यात आले की, त्याचा लॅपटॉप आणि फोनवर व्हिडीओ आणि इतर पुरावे सुद्धा आहेत, तसेच सुशांत सिंह राजपूतच्या बँक अकाऊंटवरून झालेल्या पैशांची घेवाण-देवाण देखील आमली पदार्थांची खरेदी संबंधीतच आहे. सिद्धार्थ पिठानी सुशांत सिंह राजपूतच्या जवळच्या मित्रांपैकी एक होता आणि सुशांतच्या शेवटच्या क्षणापर्यंत तो त्याच्या सोबत होता. सुशांतच्या मृत्यूबाबत अनेक शोध घेण्यात आले पण अजूनही यामागचे गूढ समोर आलेले नाही.


हेही वाचा :कर्नाटकच्या सिनी शेट्टीने पटकावला ‘मिस इंडिया 2022’ होण्याचा मान