Wednesday, June 23, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर मनोरंजन हिंदुस्थानी भाऊ कोरोनाच्या काळात रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

हिंदुस्थानी भाऊ कोरोनाच्या काळात रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

Related Story

- Advertisement -

स्वतःचे वादग्रस्त व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल करणारा सोशल मीडियावरील हिंदुस्थानी भाऊ याला शुक्रवारी विद्यार्थ्यांच्या हितासाठी आणि सरकारच्या विरोधात आंदोलन करतांना शिवाजी पार्क पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक ना करता नोटीस देऊन सोडून देण्यात आले असल्याची माहिती शिवाजी पार्क पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश कसबे यांनी दिली आहे.

विकास पाठक असे या स्वयंघोषित ‘हिंदुस्थानी भाऊ’ चे नाव आहे. पाठक हा बिगबॉस मधील माजी स्पर्धक आहे. सोशल स्वतःचे वादग्रस्त व्हिडियो तयार करून सोशल मीडियावर हिंदुस्थानी भाऊ या नावाने पोस्ट करणारा विकास पाठक हा १२ वीची ऑनलाईन परिक्षा घ्यावी यासाठी शनिवारी सरकारच्या विरोधात शिवाजी पार्क येथे एकटा आंदोलन करणार असल्याची माहिती विकास पाठक याने सोशल मीडियावर व्हायरल केले होते.

- Advertisement -

कोरोनाचे कडक निर्बंध, संचारबंदीमध्ये आंदोलन, मोर्चे यांच्यावर बंदी असल्यामुळे शिवाजी पार्क पोलिसांनी अगोदरच हिंदुस्थानी भाऊ उर्फ विकास पाठक याला ताब्यात घेण्यासाठी शनिवारी कडक बंदोबस्त ठेवला होता. मात्र पोलिसांनी आपले आंदोलन उधळून लावू नये म्हणून विकास पाठक हा एकटाच रुग्णवाहिकेतून शिवाजी पार्क परिसरात दाखल होताच त्याला ताब्यात घेतले. दरम्यान त्याने घोषणाबाजी देत असताना त्याला शिवाजी पार्क पोलीस वाहनातं बसवून पोलीस ठाण्यात आणून त्याच्यावर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने लागू केलेल्या नियमाचे उल्लंघन करणे, संचारबंदीचा आदेश मोडणे याप्रकरणी गुन्हा दाखल करून त्याला अटक न करता नोटीस देऊन सोडून देण्यात आले असल्याची माहिती शिवाजी पार्क पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश कसबे यांनी दिली आहे.

प्रक्षोभक पोस्ट तयार करून सोशल मीडियावर या पोस्ट हिंदुस्थान भाऊ च्या नावयाने पोस्ट करून स्वतःची पब्लिकसिटी करणारा विकास पाठक याचे इंस्टाग्राम ने खाते निलंबित केले होते.

- Advertisement -

पुलवामा हल्ल्यानंतर भारताविषयी बोलणाऱ्यां विरोधात त्याने स्वतःचा एका व्हिडियो तयार हिंदुस्थानी भाऊ या नावाने सोशल मीडियावर व्हायरल केला होता . या व्हिडीओला चांगले हिट्स मिळाले आणि इथूनच विकासचं ‘हिंदुस्थानी भाऊ’ असं नामकरण झालं. त्यांचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला होता.

 

- Advertisement -