अभिनेत्री डॉली बिंद्राची दबंगगिरी पडली महागात; गुन्हा दाखल

मुंबईच्या खार पोलीस ठाण्यात अभिनेत्री डॉली बिंद्रावर जिम मधील कर्मचारी आणि इतर लोकांना धमकावल्या प्रकरणी गुन्हा दाखला करण्यात आला आहे.

Dolly bindra
डॉली बिंद्रावर जिम कर्मचाऱ्याशी गैरवर्तनाबीबत गुन्हा दाखल

अनेक वाद विवादांमुळे नेहमीच चर्चेत राहणारी बिग बॉस फेम अभिनेत्री डॉली बिंद्रावर मुंबईच्या खार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिम मधील कर्मचारी तसेच इतर लोकांना धमकी आणि नाहक त्रास दिल्या प्रकरणी तिच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार लवकरच या प्रकरणी डॉली बिंद्राला कायदेशीररित्या नोटिस बजावण्यात येणार असून तिला चौकशीसाठी पोलीस ठाण्यात बोलवले जाणार आहे.

काय केला गुन्हा..?

बिग बॉस सिझन चार मधील अनेक वादग्रस्त विधान आणि आक्रमक भूमिकेमुळे अभिनयापेक्षाही अनेक वादग्रस्त कारणांमुळे लोकांच्या चर्चेत राहणारी डॉली बिंद्रा एका नव्या वादामुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. व्यायामशाळेतील कर्मचारी, तसेच इतर सहकाऱ्यांना त्रास देणे, त्यांना धमकावणे या कारणामुळे खार पोलीसांनी तिच्यावर गु्न्हा दाखल केला असून त्यामुळे ती आता चौकशीच्या फेऱ्यात अडकणार आहे.

कोणत्या कलमांतर्गत गुन्हा दाखल..?

या प्रकरणी डॉली बिंद्रावर आक्रमण करणे, अब्रूनुकसानीकारक मजकुर वितरीत करणे, धमकी देणे, शांतताभंग करणे, बदनामी करणे या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या आधीही डॉली बिंद्रावर कांदिवली पोलीस ठाण्यात एका प्रकरणा अंतर्गत राधे मॉं यांच्या कडून गुन्हा दाखल करण्यात आला होता. डॉली बिंद्रा आणि वाद हे जणु एक समीकरणच बनले आहे. तेव्हा आता हे प्रकरण कितपत वाढेल आणि डॉली बिंद्रावर काय कारवाई करण्यात येइल हा नक्कीच चर्चेचा विषय आहे.