घरमनोरंजनSushant Sucide: मुंबई पोलीस आता करणार अभिनेत्री कंगनाची चौकशी!

Sushant Sucide: मुंबई पोलीस आता करणार अभिनेत्री कंगनाची चौकशी!

Subscribe

सुशांतसिंह राजपूतने आत्महत्या का केली हे जाणून घेण्यासाठी कंगनाला काही माहिती आहे का? यासंदर्भातील चौकशी केली जाऊ शकते?

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास करणार्‍या मुंबई पोलिस आता अभिनेत्री कंगना राणावतचीही चौकशी करू शकतात. असे सांगितले जात आहे की, जेव्हा कंगना तिच्या गावाहून परतेल तेव्हा तिची चौकशी केली जाऊ शकते. गेल्या महिन्यात कंगनाला वांद्रे पोलिसांनी चौकशी पथकाला नोटीस पाठविली होती आणि अभिनेत्रीच्या अनुपस्थितीत तिच्या एका स्टाफ सदस्याकडे सोपवले होते. दरम्यान, या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत ३८ लोकांची चौकशी करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कंगना मुंबईच्या बाहेर असून हिमाचल प्रदेशमधील तिच्या घरी सध्या वेळ घालवत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुशांतसिंह राजपूतने आत्महत्या का केली हे जाणून घेण्यासाठी कंगनाला काही माहिती आहे का? यासंदर्भातील चौकशी केली जाऊ शकते? तिच्या अनेक महत्त्वपूर्ण विधानातून बरूच माहिती मिळू शकते. तसेच यासह सुशांतची प्रतिमा किंवा करिअर उद्वस्त करण्याचा जे प्रयत्न करीत होते त्यांच्याबद्दल माहिती मिळू शकते.

- Advertisement -

सुशांत सिंह राजपूतचे चाहते सातत्याने सोशल मीडियावर त्याच्या मृत्यूला नियोजित हत्या म्हणून संबोधत आहेत तर हे प्रकरण सीबीआयकडे सोपवावे अशी मागणीही ते करत आहेत. कंगनाने तिच्या नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सुशांतच्या मृत्यूचे नियोजनबद्ध हत्या असल्याचे वर्णन केले आहे.

- Advertisement -

सुशांतच्या मृत्यूवर कंगना म्हणाली होती…

सुशांतच्या मृत्यूवर कंगनाने एक व्हिडिओ शेअर केला आणि त्यात म्हटले की तो आत्महत्या करू शकत नाही, ही एक हत्या आहे. यावेळी कंगनाचा अर्थ असा नव्हता की कोणीतरी सुशांतची हत्या केली आहे, परंतु काही लोकांच्या दबावाखाली अभिनेत्याने आपले आयुष्य संपविण्याचा निर्णय घेतला. सुशांत वेगळा व्यक्ती आहे, असे जीवघेणा पाऊल तो कधीच उचलू शकत नाही असेही कंगनाने म्हटले आहे.

नुकताच याप्रकरणी मुंबई पोलिसांनी यशराज प्रॉडक्शनचे चेअरमन आदित्य चोप्रा आणि प्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांचीही चौकशी केली होती.


रेखा यांच्या बंगल्याबाहेरचा कंटेन्मेंट झोनचा बोर्ड अखेर उतरवला

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -