घरमनोरंजन‘मुंबई पुणे मुंबई-३’मध्ये ‘पिंजरा’ चित्रपटातील गाण्याचे प्रकाशन

‘मुंबई पुणे मुंबई-३’मध्ये ‘पिंजरा’ चित्रपटातील गाण्याचे प्रकाशन

Subscribe

सतीश राजवाडे दिग्दर्शीत 'मुंबई-पुणे-मुंबई ३' या चित्रपटाचा संगीत अनावरण सोहळा नुकताच मुंबईत पार पडला. शांताराम बापूंच्या अजरामर कलाकृतींपैकी एक असलेल्या पिंजरा चित्रपटातील 'गंगगग... साजणी' हे गाणंदेखील नव्या रुपात प्रेक्षकांना ऐकायला मिळणार आहे.

‘मुंबई पुणे मुंबई-३’मध्ये दडलेली एकेक रहस्ये आता उलगडू लागली आहेत. त्यातील एक रहस्य म्हणजे चित्रपटात ‘पिंजरा’ या १९७२ मध्ये आलेल्या अजरामर चित्रपटातील “कुन्या गावाची, कोनच्या नावाची, कुन्या राजाची गं तू रानी… आली ठुमकत, नार लचकत, मान मुरडत हिरव्या रानी…ग साजनी” हे गाजलेले गीत या चित्रपटात स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे यांच्यावर चित्रित करण्यात आले आहे. या दोघांनीही या गाण्यात फुल्टू धमाल केली आहे आणि त्यांचे हे नृत्य पाहण्यासारखे झाले आहे. या गाण्याचे प्रकाशन ढोल ताशांच्या निनादात विलेपार्ले येथील प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुल येथे करण्यात आले. या गाण्याच्या प्रदर्शन सोहळ्यासाठी स्वप्नील जोशी, मुक्ता बर्वे, रोहिणी हट्टंगडी, सविता प्रभुणे, मंगल केंकरे, विजय केंकरे आणि दिग्दर्शक सतीश राजवाडे हे कलाकार उपस्थित होते.

वाचा : लवकरच येणार मुंबई पुणे मुंबई ३

- Advertisement -

पिंजरामधील गाण्याला नवा साज 

चित्रपटाचे दिग्दर्शक सतीश राजवाडे आणि निर्माते आणि एव्हरेस्ट एंटरटेन्मेंटचे संजय छाब्रिया आणि सह-निर्माते अमित भानुशाली (फ्रायडे सिनेमाज) यांनी या रहस्यावरील पडदा आज उलगडला. प्रख्यात चित्रपट निर्माते व्ही शांताराम यांच्या तुफान गाजलेल्या आणि सामाजिक संदेश देणाऱ्या ‘पिंजरा’ चित्रपटातील हे गाणे ‘मुंबई पुणे मुंबई-३’मध्ये सामील करून ते आगळ्या पद्धतीने चित्रित केले गेले आहे. ‘पिंजरा’तील या गाण्याच्या चित्रपटातील समावेशामुळे रसिकांची चित्रपटाबद्दलची उत्सुकता त्यामुळे अधिकच ताणली जाणार आहे.

- Advertisement -

वाचा : ‘मुंबई – पुणे – मुंबई ३’ चे टीझर लाँच!

आदर्श शिंदेच्या आवाजातील गाणं

‘गं साजणी’ या गाण्याचे पुनरुत्थान केले गेले असून त्याला राम कदम, अविनाश-विश्वजीत यांचे संगीत आहे तर आदर्श शिंदे यांचा आवाज आहे. मूळ गाणे जगदीश खेबुडकर यांचे असून त्यात विश्वजित जोशी यांनी भर घातली आहे. अतिरिक्त ऱ्हीदम प्रोग्रॅमिंग सुदेश गायकवाड यांचे आहे. या गाण्याचे चित्रीकरण साऊंडडिज येथे झाले असून ते किट्टू मायक्कल यांनी केले आहे. मिक्सिंग आणि मास्टरिंग एव्हीजे स्टुडीओजचे आहे. गाण्याच्या संगीत कलाकारांमध्ये सोमू सील (गिटार) व कोरस गायकांचा समावेश आहे. नृत्यदिग्दर्शन सुभाष नकाशे यांनी केले आहे.

वाचा : कुणी येणार गं…

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -