घरमनोरंजन'मुंबई - पुणे - मुंबई ३' चे टीझर लाँच!

‘मुंबई – पुणे – मुंबई ३’ चे टीझर लाँच!

Subscribe

अभिनेता स्वप्निल जोशी आणि अभिनेत्री मुक्ता बर्वे यांची लवस्टोरी तीन वर्षांची झाली असून 'मुंबई-पुणे-मुंबई ३' मधून ती प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचा टीझर आज प्रदर्शीत झाला आहे.

मुंबई आणि पुणे या राज्यातील दोन महत्त्वाच्या शहरांचे नागरीक जेव्हा एकमेकांना भेटतात तेव्हा आपल्या शहराबाबत असणारा अभिमान आणि त्याची वैशिष्ट्य भरभरून सांगतात. मात्र या दोन भिन्न शहरातील लोकं एकमेकांशी लग्न करतात तेव्हा काय गंमत घडते, हे आपण या पूर्वी मुंबई – पुणे – मुंबई या चित्रपटाच्या पहिल्या आणि दुसऱ्या भागात पाहिले आहे. आता या चित्रपटाचा तिसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येत असून आज त्याचे टीझर लाँच झाले आहे. आता ही लवस्टोरी तीन वर्षांची झाली असून मुंबई-पुण्याची नोकझोक याही भागात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

 

View this post on Instagram

 

This jodi is back . ❤#mpm3teaser #mpm3 @swwapnil_joshi @muktabarve @lalit.prabhakar

A post shared by lalitprabhakar.b (@lalitprabhakar.b) on

- Advertisement -

चित्रपटाचे दोनही भाग ठरले सुपरहिट

‘मुंबई पुणे मुंबई-१’ हा चित्रपट आठ वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला होता. त्यावेळी हा चित्रपट राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सुपर-डूपर हिट ठरला. या चित्रपटाचा पुढचा भाग ‘मुंबई पुणे मुंबई-२’ दोन वर्षांपूर्वी आला आणि त्यावेळीही देखील यशाच्या इतिहासाची पुनरावृत्ती झाली. चित्रपटाचे निर्माते संजय छाब्रिया, सह-निर्माते अमित भानुशाली आणि दिग्दर्शक सतीश राजवाडे हे आहेत. हा चित्रपट येत्या ७ डिसेंबर २०१८ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

स्वप्निल – मुक्ताची जोडी 

मुंबईची मुक्ता बर्वे आणि पुण्याचा स्वप्निल जोशी यांची भेट चित्रपटाच्या पहिल्या भागात होते. तर दुसऱ्या दोघांचे लग्न होते आणि आता तिसऱ्या भागात त्यांना बाळ होणार असल्याचे टीझरमध्ये दाखवण्यात आले आहे. लवकरच या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -