Sushant Singh Rajput Case : अभिनेत्री रिया चक्रवर्तीला दिलासा; परदेशात जाण्यास कोर्टाची परवानगी

बॉलिवूड ड्रग्ज प्रकरणात रिया चक्रवर्तीला NCB ने सप्टेंबर 2020 रोजी अटक केली, यावेळी रियाला मुंबईतील भायखळा महिला कारागृहाच पाठवण्यात आले, अभिनेत्रीने एक महिन्यापेक्षा जास्त काळ तुरुंगात काढला.

mumbai special court approves rhea chakraborty travel to abroad for iifa awards
Sushant Singh Rajput Case : अभिनेत्री रिया चक्रवर्तीला दिलासा; परदेशात जाण्यास कोर्टाची परवानगी

बॉलिवूडचा दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणादरम्यान समोर आलेल्या ड्रग्ज प्रकरणातील आरोपी अभिनेत्री रिया चक्रवर्तीला (Rhea Chakraborty) मुंबई स्पेशल कोर्टाकडून दिलासा (Mumbai special court) मिळाला आहे. कोर्टाने तिला सशर्त अटींसह परदेशात जाण्याची परवानगी दिली आहे. यामुळे रियाला आयफा पुरस्कार सोहळ्यात सहभागी होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यावेळी कोर्टाने सांगितले की, अभिनेत्रीला अबुधाबीमधील भारतीय दुतावासात दररोज (Travel Abroad) हजेरी लावाली लागेल आणि 6 जून रोजी कोर्टासमोर हजेरी पत्रक सादर करावे लागेल. यासोबतचं त्यांना अतिरिक्त सुरक्षा म्हणून न्यायालयाच्या रजिस्ट्रीमध्ये एक लाख रुपये जमा करावे लागतील.

Sushant Singh Rajput Case: रिया चक्रवर्ती आपली वक्तव्ये का बदलतेय? कारण आले समोर

अभिनेत्री रिया चक्रवर्ती 2020मध्ये अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणातील (Sushant Singh Rajput Case) ड्रग्ज प्रकरणामुळे चर्चेत आली होती.  नाक्रोटिक्स कंट्रोल ब्यूरोने रियाला ड्रग्ज प्रकरणात आरोपी घोषित केले होते. यामुळे रियाला देश सोडून जाण्यास निर्बंध घालण्यात आले. यामुळे तिचा पासपोर्ट जप्त करण्यात आला होता.

यानंतर रियाच्या वकिलाने न्यायालयात अर्ज केला की, रियाला 2 जून ते 8 जूनदरम्यान अबुधाबीला आयफा (IIFA Awards) पुरस्कार सोहळ्यासाठी जायचे आहे. त्यासाठी तिला तिचा पासपोर्ट देण्यात यावा. कोर्टाने अर्ज स्वीकारला आणि रियाला तिचा पासपोर्ट देण्याचे निर्देश दिले, न्यायालयाने तिला 5 जूनपर्यंत पासपोर्ट वापरण्याची मुभा दिली आहे. तसेच 6 तारखेला पासपोर्ट चौकशी अधिकाऱ्यांकडे सोपवण्यास सांगितले आहे.

बॉलिवूड ड्रग्ज प्रकरणात रिया चक्रवर्तीला NCB ने सप्टेंबर 2020 रोजी अटक केली, यावेळी रियाला मुंबईतील भायखळा महिला कारागृहाच पाठवण्यात आले, अभिनेत्रीने एक महिन्यापेक्षा जास्त काळ तुरुंगात काढला. याचप्रकरणी अभिनेत्रीच्या भावानेही सुमारे तीन महिने तुरुंगात काढले होते. यावेळी तपासादरम्यान अभिनेत्रीचे लॅपटॉप, मोबाईल फोन अशा वैयक्तिक वस्तू जप्त करण्यात आल्या. मात्र याप्रकरणातून तिची जामीनावर सुटका झाली.

तपासादरम्यान रिया चक्रवर्तीचा ड्रग्ज प्रकरणाशी कोणताही संबंध नव्हता. तसेच तिने कथितरित्या कोणत्याही प्रकारचे ड्रग्ज खरेदी केले नव्हते, असे उच्च न्यायालयानं म्हटलं होतं. सध्या रिया सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिच्या करियर बद्दल बोलायचे झाल्यास, ती शेवटची अमिताभ बच्चन आणि इमरान हाश्मीसोबत चेहरे या चित्रपटात दिसली. (Rhea Chakraborty News)


2023 मध्ये prabhasचा ‘सालार’ आणि Allu Arjunचा ‘पुष्पा 2’ देणार एकमेकांना तगडी टक्कर