मुनव्वर फारुकीने पटकावली लॉक अपच्या पहिल्या सीझनची ट्रॉफी

लॉक अप रियालिटी शोच्या पहिल्या सीझनच्या विजेत्याची घोषणा करण्यात आली आहे. लॉक अपमध्ये ७० दिवसांचा संघर्षमय प्रवास पूर्ण झाल्यानंतर मुनव्वर फारूकी लॉक अपचा विजेता झाला आहे. मुनव्वर फारूकी सुरूवातीपासूनच उत्तम खेळत होता. त्यामुळे त्याला प्रेक्षकांची जास्त मतं मिळाली. विजेता झालेल्या मुनव्वर फारूकीला २० लाखांची रक्कम आणि ट्रॉफी देण्यात आली आहे. इतकंच नव्हे तर त्याला एक सुंदर, आलिशान कार आणि इटली ट्रिपला जायची संधी सुद्धा मिळाली आहे.

सुरूवातीपासूनच मास्टरमाईंड खेळलेल्या मुनव्वर फारूकीने प्रेक्षकांचे मन जिंकले होते. लॉक अपमध्ये प्रवेश घेताच मुनव्वरने आपली सत्याची बाजू दाखवून दिली होती. तसेच संधी मिळताच त्याने आपल्या वैयक्तिक आयुष्याबाबतही धक्कादायक खुलासे केले होते.

अंजली आणि पायलने दिली जबरदस्त टक्कर


ग्रँड फिनालेदरम्यान, टॉप ३ मध्ये मुनव्वर फारूकी, अंजली अरोरा आणि पायल रोहतगी हे तिघे होते. फिनालेमध्ये अंजली आणि पायलने, मुनव्वर फारूकीला जबरदस्त टक्कर दिली होती. त्यानंतर अंजली बाहेर पडली. पायल रोहतगी आणि मुनव्वर फारूकी टॉप २ मध्ये आले. त्यावेळी कंगनाने दोघांच्या लॉक अपमधील प्रवासाचं आणि खेळाचं कौतुक केलं. त्यानंतर विजेता म्हणून मुव्वर फारूकीचे नाव घोषित करण्यात आलं.

 


हेही वाचा :करिश्मापासून ते ऐश्वर्यापर्यंत ‘या’ अभिनेत्रींचे आहे आपल्या मुलांसोबत खास बॉन्डिंग