Thursday, September 23, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन 'बबिता जी'ने सोडले मौन म्हणाली, लोकांना माझ्या सन्मानाला धक्का लावण्यास 13 मिनिटेही...

‘बबिता जी’ने सोडले मौन म्हणाली, लोकांना माझ्या सन्मानाला धक्का लावण्यास 13 मिनिटेही लागली नाही

मुनमुन दत्ता बद्दल गेल्या काही दिवसांपासून होत असणाऱ्या चर्चांवर सोशल मीडियावर आपले मन मोकळे केले आहे. तर दुसऱ्या पोस्टमध्ये मुनमुनने मीडिया विरोधात संताप व्यक्त केला आहे.

Related Story

- Advertisement -

तारक मेहता का उल्टा चष्मा(Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) या लोकप्रिय मालिकेत काम करणारी अभिनेत्री ‘बबिता जी’ उर्फ मुनमुन दत्ता (Munmun Dutta)आजकाल मालिकेती सहकलाकार राज अनादकत(Raj Anadkat)  रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा तुफान रंगत आहे. यामुळे बबिताजी काहीशी नाराज झाल्याचे दिसतेय.अलीकडेच मुनमुन दत्ताने एक पत्र लिहून आपला राग व्यक्त केला आहे. मुनमुनने स्पष्ट शब्दात लिहिले आहे की आज मला स्वतःला भारताची मुलगी म्हणण्यास लाज वाटते.(munmun dutta aka babita ji lashes out on social media users)

मुनमुन दत्ताने राज आणि तिच्या नात्याबद्दल सुरू असलेल्या बातम्या आणि सोशल मीडियावर त्याच्याबद्दल घडणाऱ्या गोष्टींवर ही नाराजी व्यक्त केली आहे. मुनमुनने इन्स्टाग्रामवर दोन पोस्ट शेअर केल्या आहेत. या पोस्टमध्ये तिने सोशल मीडिया यूजर आणि वयावर सतत महिलांना लक्ष्य करणाऱ्यांच्या कॉमेंटवर टीका केली आहे.

- Advertisement -

मुनमनने लिहलं आहे की, सामान्य लोकांसाठी,मला तुमच्याकडून चांगल्या अपेक्षा होत्या. पण तुम्ही कमेंट मध्ये ज्या प्रकारे वाईट शब्दांचा , अस्वच्छतेचा वर्षाव केला आहे त्याने हे सिद्ध होते की तथाकथित ‘सुशिक्षित’ झाल्यानंतर आपण अशा समाजाचा भाग आहोत, जे सतत खालावत आहे. स्त्रियांच्या वयावर करण्यात आलेल्या विनोदामुळे त्यांना सतत वयामुले असुरक्षितता अनुभवयास मिळते. तुम्ही केलेल्या एखाद्या विनोदाने एखाद्याचे काय होते, तर त्यामुळे एखाद्याला मानसिकरित्या प्रेरणा मिळते किंवा त्याचे मन नाराज होते.मात्र तुम्ही त्याची कधीच फिकीर केली नाही. मी गेल्या 13 वर्षांपासून लोकांचे मनोरंजन करत आहे, पण लोकांनी माझ्या सन्मानाला धक्का पोहोचवण्यासाठी 13 मिनिटेही लागली नाहीत.

- Advertisement -

मुनमुनने पुढे लिहिले – तर पुढच्या वेळी कोणीतरी इतका उदास आहे की ज्याला स्वतःचा जीव घ्यायचा आहे, मग थांब आणि एकदा विचार कर की तुझे शब्द त्याला शेवटच्या दिशेने घेऊन जातील की नाही. आज मला स्वतःला भारताची मुलगी म्हणण्यास लाज वाटते. मुनमुन दत्ता बद्दल गेल्या काही दिवसांपासून होत असणाऱ्या चर्चांवर सोशल मीडियावर आपले मन मोकळे केले आहे. तर दुसऱ्या पोस्टमध्ये मुनमुनने मीडिया विरोधात संताप व्यक्त केला आहे.

 


हे हि वाचा – नर्गिस फाकरीने उदय चोप्रासोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचे केले कबूल म्हणाली..

- Advertisement -