घरताज्या घडामोडी'मुन्ना भाई ३' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, सर्किटने दिली गुड न्यूज!

‘मुन्ना भाई ३’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, सर्किटने दिली गुड न्यूज!

Subscribe

मुन्ना भाईच्या चाहत्यांसाठी सर्किटने एक गुड न्यूज दिली आहे. लवकरच मुन्ना भाई ३ प्रेक्षकांच्या भेटीस येण्याची शक्यता आहे.

बऱ्याच दिवसांपासून राजकुमार हिरानीचा सर्वात मोठा चित्रपट ‘मुन्ना भाई एम.बी.बी.एस’चा तिसरा पार्ट येणार असल्याची चर्चा आहे. तसेच चाहते देखील या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहे. याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही आहे. पण आता ‘मुन्ना भाई एम.बी.बी.एस’ चित्रपटमधील सर्किटची भूमिका करणारा अर्शद वारसीने इंट्रेस्टिंग खुलासा केला आहे. अर्शदने एका न्यूज पोर्टलला ‘मुन्ना भाई ३’बाबत मोठी माहिती दिली आहे. त्याने केलेला हा खुलासा चाहत्यांना खुश करू शकतो.

 

View this post on Instagram

 

A post shared by Arshad Warsi (@arshad_warsi)

अर्शदने दिलेल्या माहितीनुसार, ‘मुन्ना भाई ३’ची एक नाही तर तीन स्क्रीप्ट तयार आहेत. पण चित्रपट प्रदर्शनाबाबत कोणतीही माहिती दिली नाही. अर्शद स्वतः विचार करत आहे की, ‘मुन्ना भाई ३’ची शूटिंग का सुरू होत नाही आहे. जर स्क्रिप्ट तयार आहे, निर्माता पैसे देण्यास तयार आहेत, अशा परिस्थिती चित्रपटाची शूटिंग का सुरू होत नाही, असा प्रश्न अर्शदने उपस्थित केला आहे. त्यामुळे सध्या अर्शद ‘मुन्ना भाई ३’बाबत नाराज असल्याचे समोर येत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Arshad Warsi (@arshad_warsi)

- Advertisement -

यापूर्वी काही दिवसांपूर्वी अर्शद रागात म्हटला होता की, आता कदाचित ‘मुन्ना भाई ३’ कधीच येऊ शकणार नाही. त्याने लोकांना असे आवाहन केले होत की, राजकुमार हिरानीला विचारा की, चित्रपटावर काम सुरू का नाही करत?

फेब्रुवारी महिन्यात अशी बातमी समोर आली की, मुन्ना भाईच्या मेकर्सने चित्रपटाची आइडिया केली आहे आणि लवकरच यावर काम सुरू केले जाऊ शकते. परंतु तेव्हा संजय दत्तच्या प्रकृतीमुळे चित्रपटाचे काम पुढे ढकलले. २००३मध्ये ‘मुन्ना भाई’ सीरिजची सुरुवात झाली होती. यानंतर चित्रपटाचा सेकेंड पार्टपण आला होता, जो सुपरहिट झाला होता. त्यानंतर चाहत्यांची उत्सुकता वाढत गेली, परंतु ‘मुन्ना भाई ३’ केव्हाच प्रदर्शित झाला नाही.

- Advertisement -

हेही वाचा – आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मराठी चित्रपट ‘खिसा’ची छाप


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -