बॉलिवूडमधील लोकप्रिय चित्रपट संगीतकार प्रीतम चक्रवर्तीसोबत एक मोठी घटना घडली आहे. प्रीतम चक्रवर्तीच्या स्टुडिओमध्ये 40 लाखांची चोरी झाल्याचं प्रकरण समोर आले आहे. प्रीतमचा मॅनेजर विनित चड्डा याने मालाड पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रीतमच्या कर्मचाऱ्यांपैकी एक कर्मचारी 40 लाख रुपये घेऊन फरार झाला आहे. प्रीतमच्या मॅनेजरने याविरुद्ध एफआयआर दाखल केली आहे. पोलिसांनी याप्रकरणी प्रीतमचा ऑफिस बॉय आशिष सय्यल याची आरोपी म्हणून ओळख पटवली आहे आणि त्याला पकडण्यासाठी पथके तयार केली आहेत. चोरी केल्यानंतर तरुण पळून गेला. त्याचा मोबाईल फोन सध्या बंद आहे.
ऑफिसच्या कर्मचाऱ्याने मॅनेजरला फसवले
मिळालेल्या वृत्तानुसार, 4 फेब्रुवारी रोजी दुपारी 2 च्या सुमारास, प्रॉडक्शन हाऊसचा एक कर्मचारी प्रीतम चक्रवर्ती यांच्या संगीत स्टुडिओ, युनिमस रेकॉर्ड्स प्रायव्हेट लिमिटेडमध्ये गेला. यावेळी, संगीतकाराचे व्यवस्थापक विनीत चड्डा यांच्याकडे 40 लाख रुपये रोख असलेली बॅगही होती. विनित यांच्या म्हणण्यांनुसार, त्यांचे लक्ष नसताना कर्मचारी बॅग घेऊन पळून गेला.तर जेव्हा या बॅगेचा शोध सुरू झाला तेव्हा असे दिसून आले की पैशांनी भरलेली बॅग आशिष सय्यल नावाच्या कर्मचाऱ्याने पळवून नेली आहे.
4 फेब्रुवारी रोजी झाली होती चोरी
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 4 फेब्रुवारी रोजी दुपारी 2 वाजताच्या सुमारास प्रीतम चक्रवर्ती यांच्या संगीत स्टुडिओ, युनिमस रेकॉर्ड्स प्रायव्हेट लिमिटेडमध्ये ही चोरी झाली. त्यांचे कार्यालय मुंबईतील गोरेगाव येथे आहे.
त्याच दिवशी, एका प्रॉडक्शन हाऊसच्या सदस्याने ऑफिसमध्ये 40 लाख रुपयांनी भरलेली बॅग आणली. त्याने ती बॅग प्रीतमच्या मॅनेजर विनीत चड्डाला दिली. यावेळी आशिष सय्यल, अहमद खान आणि कमल दिशा हे कर्मचारी देखील स्टुडिओमध्ये उपस्थित होते.
पोलिसांचा तपास सुरू
या प्रकरणी एका पोलिस अधिकाऱ्याचे निवेदन समोर आले आहे. त्यानुसार , ‘पैशांनी भरलेली बॅग मिळाल्यानंतर, मॅनेजरने ती ट्रॉली बॅगमध्ये ठेवली.’ मग तो त्याच इमारतीत राहणाऱ्या प्रीतमच्या फ्लॅटवर काही कागदपत्रांवर स्वाक्षरी करण्यासाठी गेला.
तो परत आला तेव्हा त्याला आढळले की ट्रॉलीमध्ये पैसे नव्हते. त्याने ताबडतोब इतर कर्मचाऱ्यांकडे चौकशी केली आणि त्याला कळले की आशिष प्रीतमच्या घरी जाण्याच्या बहाण्याने पैसे असलेली बॅग घेऊन स्टुडिओतून निघून गेला होता. मॅनेजरने आशिषशी संपर्क साधण्याचा प्रयत्नही केला, पण तेव्हापासून त्याचा फोन बंद आहे. त्यानंतर मॅनेजरने प्रीतमला घटनेची माहिती दिली, आणि त्याने ताबडतोब तक्रार दाखल केली.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, ‘आम्ही चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. आम्ही संशयिताचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहोत.
हेही वाचा : Satish Alekar : ‘जनस्थान’ विजेते सतीश आळेकर!
Edited By – Tanvi Gundaye