Saturday, March 22, 2025
27 C
Mumbai
HomeमनोरंजनChhaava Movie Writer : मुस्लिम लेखकाने लिहिले चित्रपटातील संवाद, एक रुपयांचं मानधनही घेतलं नाही

Chhaava Movie Writer : मुस्लिम लेखकाने लिहिले चित्रपटातील संवाद, एक रुपयांचं मानधनही घेतलं नाही

Subscribe

लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ चित्रपट 14 फेब्रुवारी 2025 रोजी प्रदर्शित झाला. आठवड्याभरात या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 200 कोटींहून अधिकची कमाई केली आहे. प्रेक्षक अभिनेता विकी कौशल, अक्षय खन्ना, अभिनेत्री रश्मिका मंदाना यांच्या अभिनयाचे कौतुक करताना दिसत आहेत. या चित्रपटातील संवाद देखील एक जमेची बाजू आहे. पण छावा चित्रपटातील संवाद मुस्लिम लेखकाने लिहिल्याचे तुम्हाला समजले तर आश्चर्याचा धक्का बसेल.

मुंबई : लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ चित्रपट 14 फेब्रुवारी 2025 रोजी प्रदर्शित झाला. आठवड्याभरात या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 200 कोटींहून अधिकची कमाई केली आहे. या चित्रपटात अभिनेता विकी कौशल, अक्षय खन्ना, अभिनेत्री रश्मिका मंदाना या कलाकारांनी आपल्या भूमिका अतिशय उत्तम साकारल्या आहेत. त्यामुळे प्रेक्षकही त्यांच्या अभिनयाचे कौतुक करत आहेत. या चित्रपटातील संवाद देखील एक जमेची बाजू आहे. पण छावा चित्रपटातील संवाद मुस्लिम लेखकाने लिहिल्याचे तुम्हाला समजले तर आश्चर्याचा धक्का बसेल. (Muslim writer Irshad Kamil wrote the dialogues in the movie Chhawa)

गीतकार इर्शाद कामिल ए.आर. रहमान यांच्यासोबत मिळून छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्यकथा सांगणाऱ्या छावा चित्रपटात काम केले आहे. याशिवाय त्यांनी चित्रपटातील काव्यात्मक संवाद लिहिले आहे. महत्त्वाचे म्हणजे काव्यात्मक संवाद लिहिण्याचा त्यांचा हा पहिलाच प्रयत्न आहे. याशिवाय ऋषि वीरवानी यांनी सुद्धा चित्रपटात संवाद लिहिले आहे. दरम्यान, एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत बोलताना त्यांनी याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी म्हटले की, छावा चित्रपटातील गाणी लिहिण्यासाठी मला संधी मिळाली होती. मात्र मी गाण्यांव्यतिरिक्त चित्रपटातील काव्यात्मक संवाद लिहिण्यातही सहभागी झालो, अशी माहिती त्यांनी दिली.

हेही वाचा – Chhaava Fame Vineet Kumar Singh : छावामध्ये कवी कलश साकारणारा अभिनेता आहे डॉक्टर

इर्शाद कामिल म्हणाले की, संभाजी महाराज माझ्यासाठी केवळ एक ऐतिहासिक व्यक्तिमत्त्व नाहीत, तर ते माझ्यासाठी प्रेरणादायी आहेत. त्यांच्या आयुष्याचा अभ्यास करत संवाद लिहिणे हा माझ्यासाठी एक अभिमानास्पद अनुभव होता. छत्रपती संभाजी महाराज यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मी यासाठी कोणतेही मानधन स्वीकारलं नाही. आपण निदान एवढे तरी करूच शकतो, अशी माझी भावना होती, अशी माहिती इर्शाद कामिल यांनी दिली.

छावा चित्रपट 200 कोटींच्या क्लबमध्ये सामील

14 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झालेल्या ‘छवा’ या चित्रपटाने पहिल्या दिवसापासूनच बॉक्स ऑफिसवर विक्रमी कमाई केली आहे. ‘छावा’ने 8 दिवसांत जगभरात 342.74 कोटी रुपये कमावले आहेत. त्यामुळे चित्रपटाची प्रगती बघता 500 कोटींच्या क्लबमध्ये सामील होऊ शकतो. कारण पहिल्या आठवड्यातच चित्रपटाने 225 कोटींहून अधिकची कमाई करून 200 कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला आहे. महाराष्ट्रात या चित्रपटाला प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. एवढेच नाही तर मध्य प्रदेश आणि गोवा सारख्या राज्यांमध्ये ते करमुक्त करण्यात आले आहे.

हेही वाचा – Nargis Fakhri Secret Wedding : नर्गिस फाखरीने केलं सिक्रेट वेडिंग? पार्टनरसोबतचे फोटो व्हायरल