घरमनोरंजनअभिनेता मनोज वाजपेयीच्या वडिलांचे ८३ व्या वर्षी निधन, दिल्लीत घेतला अखेरचा श्वास

अभिनेता मनोज वाजपेयीच्या वडिलांचे ८३ व्या वर्षी निधन, दिल्लीत घेतला अखेरचा श्वास

Subscribe

बॉलिवूड अभिनेता मनोज वाजपेयी यांचे वडील राधाकांत वाजपेयी यांचे वयाच्या ८३ व्या वर्षी निधन झाले. रविवारी सकाळी त्यांनी जगाचा निरोप घेतला. काही आठवड्यांपूर्वी राधाकांत वाजपेयी यांची तब्येत बिघडल्याने त्यांना दिल्लीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ते बराच दिवसांपासून आजारी असल्याने दिल्लीत त्यांच्यावर उपचार सुरू होते. ते बिहारमधील बेतिया शहराजवळील बेलवा या लहान गावात वास्तव्यास होते. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच त्यांच्या गावात शोककळा पसरली आहे. वडिलांच्या निधनाची बातमी कळताच मनोज वाजपेयी यांनी केरळमध्ये सुरु असलेल्या चित्रपटाचं शूटिंग सोडून दिल्लीला रवाना झाले. अभिनेते मनोज यांचं आपल्या वडिलांवर खूप प्रेम होतं. मनोज वाजपेयीच्या वडिलांच्या निधनाची बातमी ‘SHE’ चे संचालक अविनाश दास यांनी या वृत्ताला दुजोरा देत ट्विट केलं आहे.

अविनाश दास यांनी फोटोसह एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी लिहिलं की, मनोज यांच्या वडीलांचे निधन झाले असून ते आता आपल्यात नाहीत. त्यांच्यासोबत घालवलेले क्षण आता आठवत आहेत. मी हा फोटो भितिहरवा आश्रमात काढला होता. ते महान सहनशक्तीचा असलेलं व्यक्तीमत्त्व होतं. नेहमी स्वतःला मुलाच्या ऐश्वर्याच्या स्पर्शापासून दूर ठेवले. माफक विणकाम करणारे ते मोठे व्यक्ती होते. अभिवादन श्रद्धांजली.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, सप्टेंबरमध्ये वाजपेयी यांच्या वडिलांची प्रकृती अचानक बिघडली. त्यावेळी अभिनेता केरळमध्ये शूटिंग करत होता. त्याला याबद्दल समजताच त्याने शूटिंग अर्ध्यातून सोडून कुटुंबापर्यंत पोहोचले. जेव्हा त्याच्या वडिलांच्या प्रकृतीत थोडी सुधारणा झाली, तेव्हा मनोज वाजपेयी शूटिंगमध्ये परतले. राधाकांत यांना तीन मुले आहेत, ज्यात सर्वात मोठा मुलगा अभिनेते मनोज वाजपेयी आहे. मनोज यांच्या वडिलांनी त्यांना पश्चिम चंपारणमधील एका छोट्याशा खेडे गावातून मुंबईला पोहोचवण्यात मोलाचे योगदान दिले आहे.


Video: नैराश्यानंतर ‘या’ समस्येचा सामना करतेय आमिर खानची मुलगी इरा
Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -