घर मनोरंजन माय बेबी, माय बोम्मा... सुकेशने लिहिलं जॅकलिनसाठी खास पत्र

माय बेबी, माय बोम्मा… सुकेशने लिहिलं जॅकलिनसाठी खास पत्र

Subscribe

200 कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणी खंडणीखोर सुकेश चंद्रशेखर मागील अनेक महिन्यांपासून तुरुंगात आहे. या मनी लाँड्रिंग प्रकरणाचा खुलासा झाल्यानंतर बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस आणि सुकेश चंद्रशेखरची लव्हस्टोरी देखील चांगलीच चर्चेत आली. या प्रकरणाबाबत अनेक खुलासे समोर येत आहेत. अनेकदा सुकेश चंद्रशेखर तुरुंगातून जॅकलिनबाबत आपलं मत व्यक्त करत असतो. दरम्यान, अशातच त्याने पुन्हा एकदा जॅकलिन फर्नांडिसला पत्र लिहिलंय. या पत्रातून सुकेशने जॅकलिनला ईस्टरसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

जॅकलिनसाठी सुकेश चंद्रशेखरने लिहिलं पत्र

सुकेशने जॅकलिनला दिलेल्या या पत्रात लिहिलंय की, “जॅकलिन माय बेबी, माय बोम्मा. बेबी, माझ्याकडून तुला ईस्टरच्या शुभेच्छा. हा तुझ्या सर्वात आवडत्या सणांपैकी एक सण आहे.  मी तुझ्यातील त्या लहान मुलाला पाहण्यासाठी खूप उत्सुक आहे जो ते एग्ज फोडून त्यात कँडीज टाकतो. तुला कल्पना नाही, पण तू खूप गोड आणि सुंदर आहेस. या पृथ्वीवर तुझ्यापेक्षा सुंदर कोणीही नाही… आय लव्ह यू, माय बेबी.”

- Advertisement -

पुढे सुकेशने लिहिलंय की, “ही वेळही निघून जाईल. पुन्हा चांगले दिवस नक्कीच येतील. मला तुझी प्रत्येक खूप आठवण येते आणि मला माहिती आहे की तुलाही माझी आठवण येते. मी तुला वचन देतो की, तुझा पुढच्या वर्षीचा ईस्टर आपल्यासाठी फारच खास असेल. यापूर्वी कधीच तू अशा प्रकारे ईस्टर साजरा केला नसशील. यासाठी मी नक्कीच प्रयत्न करेन”, असं सुकेशने लिहिलंय.

दरम्यान, सध्या 200 कोटी रुपयांच्या फसवणुकीप्रकरणी सुकेश चंद्रशेखर हा दिल्ली तुरुंगात आहे. या प्रकरणात जॅकलिनवर देखील अनेक आरोप करण्यात आले आहेत. मात्र, या मनी लाँड्रिंग प्रकरणाशी माझा काहीही संबंध नसल्याचे सांगत तिने तिच्यावर होत असलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.


- Advertisement -

हेही वाचा :

राज्य सांस्कृतिक पुरस्कारांचे सोमवारी वितरण; “उत्सव महासंस्कृतीचा” चे आयोजन

- Advertisment -