Eco friendly bappa Competition
घर मनोरंजन माझ्या कपड्यांमुळे अनेकांच्या भावना दुखावल्या... उर्फीने मागितली जाहिर माफी

माझ्या कपड्यांमुळे अनेकांच्या भावना दुखावल्या… उर्फीने मागितली जाहिर माफी

Subscribe

आपल्या अतरंगी स्टाईलमुळे सतत चर्चेत असणाऱ्या उर्फी जावेदच्या अनोख्या स्टाईलचे व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असतात. अनेकजण तिच्या हटके स्टाईलचं कौतुक करतात तर काहीजण तिला प्रचंड ट्रोल देखील करत असतात. मात्र, उर्फी कोणालाही न घाबरता आपली फॅशन आणि कपडे यांच्यात कोणताच बदल करत नाही. दरम्यान, आता अशातच उर्फीने सोशल मीडियावर सर्वांची माफी मागितली आहे.

नेहमी आपल्या ट्रोलर्सना सडेतोड उत्तर देणाऱ्या उर्फी जावेदने चक्क तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन तिच्या स्टाईलमुळे ज्यांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यांची जाहिर माफी मागितली आहे. ट्वीटरवर एक पोस्ट शेअर करत उर्फीने लिहिलंय की, “माझ्या कपड्यांमुळे अनेकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यासाठी मी माफी मागत आहे. यापुढे तुम्हाला बदलेली उर्फी पाहायला मिळेल. कपडेही बदलेले असतील. माफी,” असं उर्फीने ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

- Advertisement -

दरम्यान, आता उर्फीने मागितलेल्या या माफीमुळे अनेकजण आश्चर्यचकित झाले आहेत.एका यूजरने कमेंट करत लिहिलंय की, ती आता काय करेल… मला हे विचार करून भीती वाटते. तर दुसऱ्या युजरने कमेंट करत लिहिलंय की, बहुतेक उर्फी एप्रिल फूल करत आहे.


हेही वाचा :

आसामच्या नयनज्योती सैकियाने जिंकला ‘मास्टरशेफ इंडिया-7’चा किताब

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -