घरमनोरंजनमहानायक अमिताभ बच्चन यांनी केला 'या' आजारपणाचा खुलासा

महानायक अमिताभ बच्चन यांनी केला ‘या’ आजारपणाचा खुलासा

Subscribe

बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या आरोग्याबाबत एक धक्कादायक खुलासा केला आहे. त्यांचे यकृत ७५ टक्के निकामी झाले असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या आरोग्याबाबत एक धक्कादायक खुलासा केला आहे. त्यांचे यकृत ७५ टक्के निकामी झाले असल्याचे त्यांनी सांगितले आहे. वयाच्या ७६ वर्षीदेखील हा सुपरस्टार चित्रपट आणि रिअॅलिटी शोच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. गेल्या ४० दशकांहून अधिक काळ चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे बिग बी पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर त्यांचा लोकप्रिय शो कौन बनेगा करोडपती घेऊन आले आहेत. दरम्यान, त्यांनी आपल्या आजारपणाबाबत हा मोठा खुलासा केला आहे.

काय म्हणाले बिग बी

आपलं ७५ टक्के यकृत खराब झालेले आहे. फक्त २५ टक्के यकृतवर शरीर काम करत आहे. शिवाय क्षयासारख्या (टीबी) आजाराशी आपण दोन हात करत आहोत, असेही अमिताभ बच्चन म्हणाले. अमिताभ बच्चन एका आरोग्यविषयक कार्यक्रमात सहभागी झाले होते. टीव्हीवरच्या या कार्यक्रमात ते म्हणाले, “आपल्या आरोग्याची काळजी घ्यायला हवी. रेग्युलर चेकअप करत राहायला हवे. मला स्वतःला ट्यूबरक्युलॉसिस आणि इतरही काही आजार आहेत. पण योग्य चाचण्या झाल्या, तर याचा पत्ता लागतो आणि इलाज करणे शक्य होते. तसेच आरोग्याच्या या कुरबुरींना तुमच्यावर कुरघोडी करू देता कामा नये, असा सल्लाही अमिताभ यांनी या वेळी दिला. अमिताभ आपल्या आरोग्याची काळजी घेतात. फिटनेससाठी दररोज ठरलेला व्यायाम करतात आणि न चुकता चालायला जातात. दिवसभर आपल्या कामात व्यग्र असले तरी आरोग्याच्या बाबतीत चालढकल करत नाही, कायम सतर्क असतो, असेही ते म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा –

आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी राज्यातील पूरग्रस्तांना मदत द्या

राज ठाकरेंच्या ईडी चौकशीवरून मनसेच्या निष्ठावंत कार्यकर्त्याची आत्महत्या

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -