‘गोल्डन ग्लोब पुरस्कारा’नंतर आता ‘नाटू नाटू’ गाण्याची ऑस्कर अवॉर्डमध्ये एन्ट्री

95 व्या ऑस्कर अवॉर्ड 2023 च्या नामांकनांची मंगळवारी घोषणा करण्यात आली. यावेळी भारतातील RRR चित्रपटाच्या ‘नाटू नाटू ‘गाण्यावा बेस्ट ओरिजनल साँग या श्रेणीमध्ये नामांकन मिळालं आहे. या आधी देखील गोल्डन ग्लोबल अवॉर्डमध्ये ‘नाटू नाटू’ गाण्याने बाजी मारली होती. अशातच आता ऑस्करमध्ये देखील या गाण्याचा सहभाग झाल्याने संपूर्ण चित्रपटाची टीम सोबतच संपूर्ण भारतासाठी अभिमानाची बाब आहे.

RRR टीमने व्यक्त केला आनंद

नाटू नाटू गाण्याला ऑस्कर अवॉर्ड 2023 मध्ये नामांकन मिळाल्याने RRR चित्रपटाच्या टीमने ट्वीटर तसेच इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत आनंद व्यक्त केला आहे. तसेच अनेक कलाकारांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

jagran

 

काही दिवसांपूर्वी चित्रपटाने पटकावले तीन पुरस्कार
नुकत्याच काही दिवसांपूर्वी RRR चित्रपटातील ‘नाटू नाटू’ गाण्याने ‘गोल्डन ग्लोब पुरस्कार’पुरस्कार पटकावला. त्यानंतर याच चित्रपटाला‘बेस्ट अ‍ॅक्शन कोरिओग्राफी’ आणि ‘बेस्ट फॉरेन लँग्वेज’साठी देखील पुरस्कार मिळाला. एसएस राजामौली यांच्या RRR चित्रपटाचा सध्या जगभरात डंका पाहायला मिळत आहे. अशातच आता ऑस्करमध्ये एन्ट्री झाल्याने आणखी चाहते आणखी खूश झाले आहेत.

 


हेही वाचा :

तुमची हत्या करण्यासाठी गँग तयार… राम गोपाल वर्मांनी दिला दिग्दर्शक राजामौलींना सतर्कतेचा इशारा