घरमनोरंजनNaay Varanbhaat Loncha Kon Naay Koncha : NCPCRच्या तक्रारीनंतर 'नाय वरणभात लोन्चा...

Naay Varanbhaat Loncha Kon Naay Koncha : NCPCRच्या तक्रारीनंतर ‘नाय वरणभात लोन्चा कोन नाय कोन्चा’चा वर कारवाई, ट्रेलर हटवला

Subscribe

विशेष म्हणजे चित्रपटात दाखवण्यात आलेल्या दृष्यांमुळे महिला आयोगाने या चित्रपटाविरोधात तक्रार नोंदवली होती. त्यामुळे आता या चित्रपटाचा ट्रेलर सर्व प्लॅटफॉर्मवरून हटवण्यात आलाय. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिग्दर्शक महेश मांजरेकर यांना पत्र लिहून याबाबत लेखी खुलासा करण्यास सांगितलंय.

नवी दिल्लीः Mahesh Manjrekar Movie : मराठी-हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचा नवा चित्रपट वादात सापडलाय. लालबाग-परळमधील गिरणी कामगारांच्या जीवनावर आधारित ‘नाय वरणभात लोन्चा, कोण नाय कोन्चा’ या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये लहान मुलांबाबत आक्षेपार्ह चित्रण आढळलंय. त्यावरून आता राष्ट्रीय बाल हक्क आयोग आणि महिला आयोगानं आक्रमक पवित्रा घेतलाय. राष्ट्रीय बाल हक्क आयोगानं चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आलेल्या दृश्यांवर आक्षेप घेतला असून, महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकांकडे कारवाईची मागणी केलीय. तसेच या कारवाईचा अहवाल सात दिवसांच्या आत आमच्याकडे सादर करा, असंही राष्ट्रीय बाल हक्क आयोगाचे अध्यक्ष प्रियंक कानूनगो यांनी सांगितलंय.

विशेष म्हणजे चित्रपटात दाखवण्यात आलेल्या दृष्यांमुळे महिला आयोगाने या चित्रपटाविरोधात तक्रार नोंदवली होती. त्यामुळे आता या चित्रपटाचा ट्रेलर सर्व प्लॅटफॉर्मवरून हटवण्यात आलाय. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिग्दर्शक महेश मांजरेकर यांना पत्र लिहून याबाबत लेखी खुलासा मागितलाय. वरन भात लोन्चा कोण नाय कोन्चा या सिनेमाच्या प्रदर्शित झालेल्या ट्रेलरमध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली महिला आणि लहान मुलांची अवहेलना करण्यात आल्याच रुपाली चाकणकर यांनी म्हटलंय. या चित्रपटाचं प्रदर्शन रोखण्याची मागणी त्यांनी पत्राद्वारे केलीय.

- Advertisement -


चित्रपटात नेमकं काय आहे?

दिवंगत ज्येष्ठ लेखक, पत्रकार जयंत पवार यांच्या ‘वरणभात लोन्चा नि कोन नाय कोन्चा’ या कथासंग्रहावर आधारीत हा चित्रपट आहे. मात्र, महेश मांजरेकर यांनी त्या नावामध्ये देखील बदल केलाय. तसेच त्यात गिरणी कामगारांविषयी हिडीस पद्धतीचे चित्रीकरण करण्यात आलेय. महेश मांजरेकर यांच्या बाबतीत हे पहिल्यांदाच असे घडलेले नाही. याआधी देखील त्यांनी जयंत पवार यांच्या ‘अधांतर’ या नाटकावरून ‘लालबाग परळ’ हा चित्रपट काढला होता. त्यातही गिरणी कामगारांच्या अवस्थेचे अक्षरशः विकृत चित्रण केले होते. दरम्यान आता ‘नाय वरणभात लोन्चा, कोण नाय कोन्चा’ या नव्या चित्रपटावरून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. प्रोमोमधील काही दृश्यांवर भारतीय स्त्री शक्ती या संस्थेने राष्ट्रीय महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली. तक्रारीची दखल घेत राष्ट्रीय महिला आयोगाने नोटीस बजावत केंद्रीय माहिती प्रसारण खात्याकडे तक्रार केली आहे. त्यानंतर आता त्याचा प्रोमो सोशल मीडियावरून हटवण्यात आलाय.

- Advertisement -

हेही वाचाः महेश मांजरेकरांचे गिरणी कामगारांच्या स्त्रियांचे हिडीस चित्रीकरण, ‘नाय वरणभात लोन्चा’ प्रोमोवर राज्यभरातून संताप

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -