Monday, March 17, 2025
27 C
Mumbai
HomeमनोरंजनNadaaniyan Movie : नादानियांमध्ये स्टारकिड्ससोबत झळकणार बॉलिवूडचे दिग्गज तारे

Nadaaniyan Movie : नादानियांमध्ये स्टारकिड्ससोबत झळकणार बॉलिवूडचे दिग्गज तारे

Subscribe

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम खान आणि बोनी कपूरची मुलगी खुशी कपूर यांचा ‘नादानियां’ हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. या सिनेमातून इब्राहिम अली खान बॉलिवूड डेब्यू करतोय. त्यामुळे सिनेविश्वात आणखी एका स्टारकिडची भर पडणार आहे. दरम्यान, या सिनेमात इब्राहिम आणि खुशीसोबत बॉलिवूडचे काही दिग्गज कलाकारसुद्धा झळकणार आहेत. ज्यामध्ये दिया मिर्जा, महिमा चौधरी आणि सुनील शेट्टी यांच्या नावांचा समावेश आहे. (Nadaaniyan Movie Update this celebs playing important role with Star Kids)

काय आहे ‘नादानियां’?

बॉलिवूडचा ‘नादानियां’ हा आगामी सिनेमा रोमँटिक कॉमेडी ड्रामा आहे. ज्यामध्ये दिल्लीची मुलगी आणि मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलाची गोष्ट दाखवण्यात आली आहे. ज्यात खुशी आपल्या मैत्रिणीच्या बचावासाठी इब्राहिमला स्वतःचा नकली बॉयफ्रेंड बनवते. या दरम्यान त्यांना एकमेकांबद्दल खरोखर प्रेम वाटू लागतं आणि अशाप्रकारे सिनेमाचं पूर्ण कथानक त्यांच्याभोवती फिरतं. यापुढे काय काय होतं? हे पाहण्यासाठी तुम्हाला सिनेमा पाहावा लागेल. फिल्म मेकर्सने अलीकडेच या सिनेमाबाबत नवी अपडेट दिली. ज्यामध्ये त्यांनी या सिनेमात झळकणाऱ्या इतर कलाकारांविषयी माहिती दिली आहे.

‘नादानियां’मध्ये झळकणार मुरलेले कलाकार

मेकर्सने दिलेल्या माहितीनुसार, ‘नादानियां’ या सिनेमात स्टारकिड्ससोबत बॉलिवूड सिनेविश्वातील काही नामांकित चेहरे झळकणार आहेत. ज्यात अभिनेत्री दीया मिर्जा, महिमा चौधरी, अभिनेता जुगल हंसराज आणि सुनील शेट्टी यांचा समावेश आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Dharmatic (@dharmaticent)

तसेच या सिनेमात दिया मिर्जा आणि जुगल हंसराज हे इब्राहिमच्या आई वडिलांची भूमिका साकारणार आहेत. तर खुशीच्या आई वडिलांची भूमिका अभिनेत्री महिमा चौधरी आणि सुनील शेट्टी साकारताना दिसतील. यामुळे आता प्रेक्षकांची सिनेमाबाबत असणारी उत्सुकता आणखीच वाढू लागली आहे.

बॉलीवूडला मिळणार नवी जोडी

‘नादानियां’ सिनेमाच्या निमित्ताने बॉलिवूड सिनेविश्वाला इब्राहिम अली खान आणि खुशी कपूर ही नवी जोडी मिळणार आहे. या सिनेमात इब्राहिम आणि खुशी रोमांस करताना दिसणार आहेत. त्यामुळे एक नवी जोडी आणि एक नवी केमिस्ट्री पाहायला मिळेल. असे असले तरीही ही जोडी प्रेक्षकांना किती भावते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. या सिनेमातील पहिले गाणे ‘इश्क में’ अलीकडेच रिलीज झाले. ज्याला ठीक ठाक प्रतिसाद मिळाला. पण या नव्या जोडीला पाहायला प्रेक्षक उत्सुक आहेत, इतके कळले. हा सिनेमा कधी रिलीज होणार याची माहिती अद्याप गुलदस्त्यात आहे. माहितीनुसार, हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर स्ट्रीम होणार आहे.

इब्राहिम अली खान या सिनेमातून बॉलिवूड डेब्यू करतोय. तर खुशी कपूरचा ‘लवयापा’ हा सिनेमा सिल्व्हर स्क्रीन डेब्यू आहे. या सिनेमात खुशीसोबत अभिनेता आमीर खानचा मुलगा जुनैद खान मुख्य भूमिकेत झळकला आहे. हा सिनेमा उद्या (7 फेब्रुवारी) थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. ज्यात खुशी आणि जुनैदसोबत आशुतोष राणा, तन्विका पार्लिकर, किकू शारदा आणि कुंज आनंद यांसारखे मोठमोठे कलाकार झळकणार आहेत.

हेही पहा –

Mawra Hocane : सनम तेरी कसम फेम अभिनेत्रीचा पाकिस्तानी अभिनेत्याशी निकाह