घरमनोरंजनसिंगर लकी अली यांच्या निधनाच्या अफवांना उधाण,मैत्रिण नफीसा अलीने ट्विट करत केला...

सिंगर लकी अली यांच्या निधनाच्या अफवांना उधाण,मैत्रिण नफीसा अलीने ट्विट करत केला खुलासा

Subscribe

"एक पल का जीना" गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट पुरुष पार्श्वगायकाचा फिल्मफेअर पुरस्कार त्यांना मिळाला होता. सूर. बचना ए हसीनो,अंजना अंजनी आणि तमाशा सारख्या चित्रपटांना आपला आवाज दिला आहे.

कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावाने जागोजागी हाहाकार माजवला आहे. संपूर्ण जनजीवन  उध्वस्त झाले आहे. तसेच कोरोनाच्या उद्रेकामुळे रुग्णसंख्येतही झपाटयाने वाढ होत आहे. अशातच बॉलिवूड मधील अनेक सेलिब्रिटींनादेखील कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहेत. कोरोनाच्या भयाण परिस्थितीत अनेक अवफा सोशल मीडियावर वेगाने पसरत आहेत. प्रसिद्ध बॉलिवूड सिंगर लकी अली यांचे कोरोनामुळे निधन झाले असल्याची चर्चा सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मात्र या निव्वळ खोट्या अफवा असल्याचे लकी अली यांची मैत्रीण नफिसा अलीने ट्विट करत संगितले आहे. त्यांनी पुढे लिहल आहे की,” लकी एकदम ठीक आहे. नुकतच आमचं बोलणं झाले आहे. लकी त्याच्या परिवारासोबत फार्महाऊसवर वेळ घालवत आहे. तसेच त्याला कोरोना झाला नसून त्याची प्रकृती व्यवस्थित आहे.”
एका मुलाखती दरम्यान नफिसा अलीने म्हंटले आहे की,” लाकीशी दिवसातून अनेकदा माझे बोलणे होते. तो त्याच्या आगामी म्यूझिक कॉन्सर्टच्या प्लानिंगमध्ये सध्या भरपूर व्यस्त आहे. तसेच आम्ही व्हर्चुअल कॉन्सर्ट बद्दल विचार करत आहोत. तो सध्या बंगळूर मध्ये आहे. असे नफिसा म्हणाली.

- Advertisement -

लकी अली, एक भारतीय गायक, गीतकार आणि अभिनेता आहे. लकी अलीने ‘दुश्मन दुनिया का’ या चित्रपटातील “नशा नशा” गाण्याद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर त्यांनी एक पल का जीना,ना तुम जानो ना हम ‘कहो ना … प्यार है’ चित्रपटातील अनेक प्रसिद्ध गाणी गायली आहेत. 2001 मध्ये “एक पल का जीना” गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट पुरुष पार्श्वगायकाचा फिल्मफेअर पुरस्कार त्यांना मिळाला होता. सूर. बचना ए हसीनो,अंजना अंजनी आणि तमाशा सारख्या चित्रपटांना आपला आवाज दिला आहे.


हे हि वाचा – सुगंधा मिश्राचा अस्सल मराठमोळा थाट, महाराष्ट्रीयन पेहरावाने जिंकली मन

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -