‘त्याला सांभाळणं कठीण झालं होतं’, Samantha – Naga Chaitanyaच्या घटस्फोटानंतर वडील नागार्जुन यांची प्रतिक्रीया

'मला गर्व आहे की दोघेही अशा परिस्थितीत फार शांत होते. मात्र यात माझ्या मुलाला फार त्रास झाला', असे ते म्हणाले. ते म्हणाले, 'समांथासोबत घटस्फोट झाल्यानंतर एक वडील म्हणून मला माझ्या मुलाची फार काळजी वाटत होती.

Nagarjuna reaction on amantha ruth prabhu and naga chaitanya divorce
'त्याला सांभाळणं कठीण झालं होतं', Samantha - Naga Chaitanyaच्या घटस्फोटानंतर वडील नागार्जुन यांची प्रतिक्रीया

टॉलिवूडची प्रसिद्ध जोडी समांथा रूथ प्रभू (Samantha Ruth Prabhu )   आणि नागा चैतन्य (Naga Chaitanya)  यांचा मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात घटस्फोट झाला आणि त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला. ही जोडी केवळ साउथ नाही बॉलिवूड हॉलिवूडमध्ये देखील प्रसिद्ध होती. 2014 मध्ये ऑटोनगर सूर्य या सिनेमाच्या शूटींगवेळी ते एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यानंतर नागा चैतन्यचे वडील अभिनेते नागार्जुन यांनी 2015मध्ये त्यांचे लग्न लावून दिले. 6 ऑक्टोबर 2017मध्ये दोघांनी गोव्यात लग्न केले. मात्र लग्नाच्या चार वर्षांनंतर दोघांचे नाते तुटले.

अभिनेत्री समांथाने 2ऑक्टोबर 2021 ला सोशल मीडियावर पोस्ट शेअर दोघांचा घटस्फोट झाल्याची माहिती दिली होती. ‘फार विचार करुन मी आणि नागा चैतन्यने वेगळे होण्याचा निर्णय घेतला असून आजपासून आमचे मार्ग वेगळे आहेत. आम्ही पती पत्नी म्हणून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. आमच्या नात्यात आमच्या मित्र मंडळींचा फार महत्त्वाचा सहभाग हे आमचे भाग्य. मात्र आमचे नाते राहिले नाही. परंतु आपले नाते असेच राहिल अशी मला आशा आहे’, असे समांथाने तिच्या पोस्टमध्ये म्हटले होते.

घटस्फोटानंतर नागा चैतन्यने एका वाहिनीला मुलाखत देताना म्हटले होते की, ‘आम्ही वेगळे होणे हेच आमच्यासाठी चांगले होते. आमच्या दोघांच्या आनंदासाठी आम्ही हा निर्णय घेतला. जर ती आनंदी आहे तर मीही आनंदी आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत घटस्फोट घेणे योग्य होते’.

नागाचैतन्यचे वडील नागार्जुन (Nagarjuna ) यांनाही मुलाच्या घटस्फोटाचा फार त्रास झाला होता. त्यांनी फर्स्ट पोस्टला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते की, ‘मला गर्व आहे की दोघेही अशा परिस्थितीत फार शांत होते. मात्र यात माझ्या मुलाला फार त्रास झाला’, असे ते म्हणाले. ते म्हणाले, ‘समांथासोबत घटस्फोट झाल्यानंतर एक वडील म्हणून मला माझ्या मुलाची फार काळजी वाटत होती. मात्र त्याला स्वत: पेक्षा माझी जास्त काळजी होती. ते नेहमी मला ‘बाबा तुम्ही ठीक आहात ना?’ असे विचारत होता. तेव्हा ‘मी हा प्रश्न तुला विचारायला हवा’ असे त्याला म्हणत होतो. त्या दिवसात त्याला सांभाळणे फार कठीण झाले होते’.


हेही वाचा – Samantha Prabhu: समांथा प्रभूची लवकरच बॉलिवूडमध्ये एंट्री