‘नागिन३’ फेम पर्ल वी पुरीला जामीन मंजूर, पोस्को अंतर्गत करण्यात आली होती अटक

पर्लच्या अटकनेनंतर त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का

'Nagin 3' fame Pearl V Puri granted bail, arrested under POSCO
'नागिन३' फेम पर्ल वी पुरीला जामीन मंजूर, पोस्को अंतर्गत करण्यात आली होती अटक

‘नागिन ३’ (‘Nagin 3) या प्रसिद्ध टिव्ही मालिकेतील मुख्य भूमिकेत असलेला अभिनेता पर्ल व्ही पुरीला (Pearl V Puri)  जामीन मंजूर झाला आहे. (Nagin 3 fame Pearl V Puri granted bail, arrested under POSCO)  काही दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांनी पर्ल व्ही पुरीला अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी पोस्को (POSCO) कायद्याअंर्तगत अटक करण्यात आली होती. ४ जून रोजी अभिनेता पर्ल व्ही पुरीला  IPC कलम CR IPC ३७६AB,R\w पोस्को कायदा ४,८,१२,१९ आणि २१ अंतर्गत अटक करण्यात होती. पर्ल व्ही पुरीची मैत्रीण अभिनेत्री करिश्मा तन्ना (Karishma Tanna) हिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे. ‘सत्यमेव जयते,सत्य नेहमीच जिंकते आणि पर्ल जिंकला’, असे करिश्माने तिच्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

पर्लच्या अटकनेनंतर त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. निर्माते विकास कलंत्री,रुचिका कपूर,मुश्ता शेख यांच्यासह अनेकांनी करिश्मा तन्ना हिच्या पोस्टवर #istandwithpearl असे म्हटले आहे. सोशल मीडियावर हा हॅशटॅग ट्रेड झाल्यानंतर अनेकजण पर्लच्या समर्थनार्थ उभे राहिले आहेत. त्याचप्रमाणे पर्ल व्ही सोबतचा फोटो शेअर करत निर्माती एकता कपूरनेही न्यायाची बाजू मांडली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Karishma Tanna (@karishmaktanna)


निर्माती एकता कपूरने पीडित मुलीच्या आईसोबत झालेल्या संभाषणाविषयीही सांगितले. एकता कपूरने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत त्यात असे लिहिले आहे की, पीडित मुलीच्या आईशी खूप वेळ बोलल्यानंतर एक गोष्ट लक्षात आली आहे की, पर्लचा यात काहीही दोष नाही. खरा दोषी तर तिचा नवरा आहे जो आपल्या मुलीला स्वत:जवळ ठेवण्यासाठी खोटी गोष्ट तयार करत आहे. सेटवर काम करणारी आई आपल्या मुलीची काळजी घेऊ शकत नाही हे त्याला सिद्ध करायचे आहे. तुम्ही जे सत्य ऐकत आहात ते अगदी चुकीचे आहे.

शेवटी पोस्टमध्ये एकता कपूर हिने असे म्हटले आहे की, मी लोकांना विनंती करते की त्यांनी स्वत: या प्रकरणी खोलात चौकशी करा. आजच्या काळात महत्त्वाची चळवळ चुकीच्या मार्गाने वापरली जात आहे हे समजून घेणे घ्या तरच न्याय मिळू शकेल. अभिनेता पर्ल व्ही पुरीला नागिन या मालिकेमुळे लोकप्रियता मिळाली. याआधी त्याने बेपनाह प्यार,ब्रम्हराक्षस २, नागिन ३, नागार्जुन एक योद्धा यासांरख्या प्रसिद्ध मालिकांमध्ये काम केले आहे.


हेही वाचा – Photo: अभिनेत्री यामी गौतम अडकली दिग्दर्शक आदित्य धरसह लग्नबंधनात