Jhund Release: अमिताभ बच्चन यांचा ‘झुंड’ सिनेमा ‘या’ दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला

खरंतर हा सिनेमा जून २०२१मध्येच रिलीज होणार होता. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सिनेमा रिलीज न करण्याचा निर्णय निर्मात्यांनी केला. मात्र आता अखेर ४ मार्चला सिनेमा प्रेक्षकांना पाहता येणार आहे.

कोरोना काळात लांबणीवर पडलेल्या सिनेमांपैकी एक महत्त्वाचा सिनेमा म्हणजे झुंड. सैराट (Sairat Movie)  फेम नागराज मंजुळे (nagraj manjule)   दिग्दर्शीत आणि अमिताभ बच्चन ( amitabh bachchan) अभिनीत झुंड (Jhund Release Date) या सिनेमाच्या रिलीज डेटची  घोषणा निर्मात्यांनी केली आहे. सोशल मीडियावर सिनेमाचे पोस्टर शेअर करत ही माहिती देण्यात आली आहे. येत्या ४ मार्चला सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘या टोळीसोबत स्पर्धा करायला तयार राहा.आमची टीम येतेय… झुंड! ४ मार्चपासून तुमच्या जवळच्या सिनेमागृहात’, असे म्हणत बिग बींनी सिनेमाचे पोस्टर शेअर केले आहे.

दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी आपल्या कामाचा झेंडा थेट बॉलिवूडमध्ये रोवून बिग बींसोबत झुंड हा सिनेमा तयार केला. झुंड या सिनेमाची प्रेक्षक अनेक दिवसांपासून आतूरतेने वाट पाहत होते. खरंतर हा सिनेमा जून २०२१मध्येच रिलीज होणार होता. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सिनेमा रिलीज न करण्याचा निर्णय निर्मात्यांनी केला. मात्र आता अखेर ४ मार्चला सिनेमा प्रेक्षकांना पाहता येणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Amitabh Bachchan (@amitabhbachchan)

अमिताभ बच्चन यांनी शेअर केलेल्या पोस्टवर अमिताभ बच्चन यांची लेक श्वेता बच्चन नंदाने फायर इमोजी शेअर करत ‘yessss’ अशी कमेंट केलीय. तर नात नव्या नवेलीने देखील ‘woooo’ म्हणत बिग बींचा उत्साह वाढवला आहे.

झुंड हा सिनेमा एक स्पोर्ट ड्रामा असून स्लम सॉकर एनजीओचे फाउंडर विजय बरसे यांच्या आयुष्यावर आधारित हा सिनेमा आहे. अभिनेते अमिताभ बच्चन विजय बरसे यांची प्रमुख भूमिका साकारणार आहे. २०२१मध्येच सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. प्रेक्षक सिनेमाची आतूरतेने वाट पाहत होते मात्र प्रेक्षकांची आतूरता आता संपली असून ४ मार्चला सिनेमा थिएटरमध्ये प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहे.


हेही वाचा – Gangubai Kathiawadi: गंगूबाई काठियावाडीचं नवं पोस्टर रिलीज, आलियाचा कातील लूक पुन्हा एकदा व्हायरल