घरमनोरंजननागराज मंजुळे यांना डी वाय पाटील विद्यापीठाकडून डॉक्टरेट पदवी प्रदान

नागराज मंजुळे यांना डी वाय पाटील विद्यापीठाकडून डॉक्टरेट पदवी प्रदान

Subscribe

मराठी सिनेसृष्टीत लेखक, दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी पिस्तुल्या, फँड्री, सैराट आणि आता झुंड असे सामाजिक विषमतेवर भाष्य करणारे चित्रपट आणून नवा इतिहास घडवला. या चित्रपटांना प्रेक्षकांनी देखील भरभरून प्रतिसाद दिला. सैराटने तर बॉक्स ऑफिसवर कमाईचे सर्व रेकॉर्ड ब्रेक केले. या चित्रपटांचे कर्ते नागराज मंजुळे यांना आद डी वाय पाटील विद्यापीठाकडून डॉक्टरेट (D. Litt) ही पदवी प्रदान करण्यात आली आहे. नागराज मंजुळे यांनी चित्रपट क्षेत्रात लेखक, दिग्दर्शक आणि अभिनयात दिलेल्या विशेष योगदानाबद्दल त्यांचा डॉक्टरेट पदवी देऊन सन्मान करण्यात आला. त्यांच्या या योगदानामुळे त्यांना डी. लीट (Dr. Nagraj Manjule D. Litt) बहाल करण्यात आली आहे.

- Advertisement -

नागराज मंजुळे यांचे मित्र प्रा. हनुमंत लोखंडे यांनी एक फेसबुक पोस्ट करत ही माहिती शेअर केली आहे. नागराज मंजुळे डॉक्टरेट पदवी स्वीकारतानाचे काही फोटो शेअर करत प्रा. लोखंडे यांनी भली मोठी पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले की, एम.फिल किंवा SET/NET वर मात करण्यासाठी पुणे विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये अंधारलेल्या दिवसात चकरा मारतानाचे दिवस आठवतात. तेव्हा मला नेहमी तुझ्यासाठी हीच इच्छा होती!!

चार्ली चॅप्लिन म्हणतो, “अपयश हे बिनमहत्त्वाचे असते. स्वतःला मूर्ख बनवण्यासाठी धैर्य लागते. तुम्ही अपयशाच्या झळा सोसत होता पण तुम्ही तुमच्या संघर्षापुढे कधीही हार मानली नाही. दहावी नापास ते डी.लिट पर्यंतचा तुमचा एक अप्रतिम, स्वप्नवत प्रवास आहे. तुमच्या प्रतिष्ठित चित्रपटांसाठी अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांद्वारे सन्मानित झाल्यानंतर आता तुम्हाला DY पाटील विद्यापीठाकडून डॉक्टर ऑफ लेटर्स (D. Litt.) हा किताब प्रदान करण्यात येत आहे. या क्षणाचा साक्षीदार होणे हा माझ्यासाठी अतिशय आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण आहे.

- Advertisement -

इतिहासात तुमचे नाव ‘द फेमस फेल्युअर्स’मध्ये आधीपासूनच आहे आणि सन्मानासाठी शिक्षणात एवढी सर्वोच्च पदवी मिळवणे म्हणजे आश्चर्यकारक गोष्ट आहे. डॉ. नागराज मंजुळे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुमच्या स्टडी रूममध्ये टांगण्यासाठी एक परिपूर्ण फ्रेम! प्रिय मित्र-तत्वज्ञ-मार्गदर्शक…तुझ्यावर खूप प्रेम करतो. अशा आशयाची पोस्ट हनुमंत लोखंडे यांनी लिहिली आहे.

मराठी सिनेविश्वातील पदार्पणापासूनच नागराज मंजुळे वेगळ्या धाटणीचे चित्रपटांची रांग लावली. पिस्तुल्या, फँड्री, सैराट आणि आता झुंड या सिनेमातून त्यांनी सामाजिक विषमतेवर बोट ठेवले. सैराट मराठी सिनेमाची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेण्यात आली. बॉक्स ऑफिसर या सिनेमाने कमाईचे सर्व रेकॉर्ड ब्रेक केले. अनेक पुरस्कार या चित्रपटाने मिळवले. या चित्रपटांमधील गायक अजय- अतुल यांच्या गाण्यांना देखील प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली, एकूणच नागराज मंजुळे यांच्या आत्तापर्यंतच्या सर्व चित्रपटांना प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे.


विवेक अग्निहोत्रीने ‘भोपाली’चा अर्थ सांगितला ‘Homosexual’; काँग्रेस नेते भडकले

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -