HomeमनोरंजनKBC : कौन बनेगा करोडपतीच्या सेटवर वनवास चित्रपटाचे कलाकार

KBC : कौन बनेगा करोडपतीच्या सेटवर वनवास चित्रपटाचे कलाकार

Subscribe

कौन बनेगा करोडपतीच्या सेटवर वनवास चित्रपटाचे कलाकारांनी उपस्थिती दर्शवली आहे. यावेळी नाना पाटेकर यांनी अमिताभ बच्चन यांना ग्राम्य जीवनातील शांतता आणि समाधान याबद्दल अनुभव सांगितले. “मी तर गावाकडचा माणूस आहे आणि तिथलाच राहणार, तिथेचे बरे वाटते.”, असे ते म्हणाले. येत्या शुक्रवारी, कौन बनेगा करोडपती 16 मध्ये ‘वनवास’ चित्रपटाचे कलाकार – नाना पाटेकर, उत्कर्ष शर्मा, सिमरत कौर आणि लेखक-दिग्दर्शक अनिल शर्मा उपस्थित राहणार आहेत. यावेळी नाना पाटेकर होस्ट अमिताभ बच्चन समोर हॉटसीटवर बसणार आहेत.

त्यांच्याशी हलक्या-फुलक्या, मनमोकळ्या गप्पा मारताना अमिताभ बच्चन यांनी त्यांना विचारले की, तुम्हाला असे कधी वाटले आहे का, की आपण गावातच राहिले पाहिजे? त्यावर नाना म्हणाले की, “मी या व्यवसायातील नाही, मी गावाकडचा माणूस आहे. मी इकडे काम करतो, आणि परत गावात जातो. मी गाव-खेड्यात राहतो, आणि तिथेच राहणार.
त्यानंतर बच्चन यांनी नाना पाटेकरला विचारले की, गावातली त्यांची दिनचर्या कशी असते. त्यावर नाना पाटेकरने उत्तर दिले, “मी सकाळी उठतो, तिकडे मी स्वतःचे एक जिम बनवले आहे. माझ्याकडे दोन गाई आणि एक बैल आहे. आणखी काही असण्याची गरजच नाही- मीच सगळं काही करतो.” न्याहारी, जेवण – माझे सगळे जेवण मीच बनवतो. मी खरोखर चांगले जेवण बनवतो. कधी कधी तर मला वाटते की, तर माझी चित्रपटात कारकीर्द झाली नसती, तर मी एक छोटेसे हॉटेल उघडले असते. पण, मी जितकी अपेक्षा केली होती, त्यापेक्षा आयुष्याने मला खूप जास्त दिले आहे. माझ्या गरजा अगदी साध्या झाल्या आहेत. संध्याकाळी, माझ्या सोबतील पुस्तकं असतात. काही मी वाचली आहेत, काही वाचलेली नाहीत. चार पाच कपाटं भरून पुस्तकं आहेत. शहरात आपल्याकडे भिंती असतात, माझ्या गावात डोंगरांनी मला वेढले आहे. मी त्यांच्या मध्यात राहतो. इतके सोपे आहे जीवन! तिकडे गजराचे घड्याळ नाही, सकाळी पक्षी मला उठवतात. आमच्याकडे मोर सुद्धा येतात, कधीकधी.”

- Advertisement -

पुढे म्हणाले, “तुम्ही खरोखर मला मंत्रमुग्ध केले आहे. कधी तरी यायलाच हवे तुमच्याकडे.” नाना पाटेकर तत्परतेने म्हणाला, “अर्थात. नक्की या. मी नेहमी माझ्या मित्रांना सांगतो की हे घर माझ्या एकट्याचे नाही. ते तुमचेही आहे. तिकडे घरासारखे वाटते, म्हणून नक्की या आणि रहा.” नाम फाऊंडेशनसाठी खेळत असताना नाना पाटेकरने त्याच्या जिव्हाळ्याच्या विषयाबद्दल सांगितले. शेतकऱ्यांची आत्महत्या रोखण्यासाठी जागरूकता आणून त्यासाठी निधी उभारण्याचे काम नाना पाटेकर करतात.

 

- Advertisement -

 


Edited By – Chaitali Shinde

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -