HomeमनोरंजनNana Patekar Virat Kohli : विराटसाठी नाना पाटेकर राहतात उपाशी? नेमकं...

Nana Patekar Virat Kohli : विराटसाठी नाना पाटेकर राहतात उपाशी? नेमकं प्रकरण काय

Subscribe

Nana Patekar is Virat Kohli Fan : लोकप्रिय बॉलिवूड अभिनेता नाना पाटेकर हे त्यांच्या स्पष्ट वक्तव्यांसाठी ओळखले जातात. नाना पाटेकरांना क्रिकेटची खूप आवड आहे. त्यांचा आवडता क्रिकेटपटू कोण, याबाबत त्यांनी नुकतंच एका मुलाखतीत उत्तर दिलं. नाना विराट कोहलीचे खूप मोठे चाहते आहेत. त्यांना विराटला मैदानात खेळताना बघायला फार आवडतं. त्याची विकेट पडल्यावर ते खाणंपिणंही सोडतात असं मुलाखतीत बोलताना नानांनी भाष्य केलं.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाचवा कसोटी सामना सिडनीमध्ये खेळवण्यात आला. या सामन्या विराट कोहली धावांचा पाऊस पाडेल, अशी अपेक्षा असताना तो लवकर बाद झाला. यामुळे भारतीयांचा हिरमोड झाला. कोहली आऊट झाल्यावर नाना पाटेकर यांनीही निराशा व्यक्त केली. आपल्या आवडत्या क्रिकेटपटबद्दल नाना पाटेकर यांनी टीव्ही ९ ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं. “विराट एक असा खेळाडू आहे. ज्याचा मी मोठा चाहता आहे. जर विराट आऊट झाला तर माझी भूक मरते. काही खाण्याची इच्छा राहत नाही.’ नाना पाटेकर यांचं हे वक्तव्य सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालं. सोशल मीडियावर अनेकांनी नाना पाटेकरांच्या या वक्तव्याचा उल्लेख करत ते आज जेवणार नाहीत, असे मीम्स बनवले. तर कोहली मैदानात खेळायला येण्याआधीच नानांनी जेवून घ्यावं असा सल्ला काही नेटकरी देत आहेत.

नाना पाटेकर यांच्या कामा विषयी बोलायचं झालं तर ते डिसेंबर 2024 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘वनवास’ मध्ये दिसले.  या चित्रपटात त्यांच्याबरोबर उत्कर्ष शर्मा, सिमरत कौर, खुशबू सुंदर या कलाकारांच्या भूमिका होत्या. आता ते लवकरच ‘हाउसफुल 5’ मध्ये दिसणार आहेत.