घरमनोरंजननाना पाटेकर यांनी तनुश्रीला बजावली नोटीस

नाना पाटेकर यांनी तनुश्रीला बजावली नोटीस

Subscribe

तनुश्री दत्ताने अभिनेता नाना पाटेकर यांच्यावर लावलेल्या आरोपांविरोधात आता नाना यांनीही कायदेशीररित्या पाऊल उचलत तिला नोटीस बजावली आहे.

तनुश्री दत्ताने अभिनेता नाना पाटेकर यांच्यावर लावलेल्या आरोपांविरोधात आता नाना यांनीही कायदेशीररित्या पाऊल उचललं आहेत. त्यांनी यासंदर्भात तनुश्रीला नोटीस बजावली असून तिने आपल्याला बदनाम केल्याप्रकरणी माफी मागावी असे नोटीसीत नमूद केले आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून बी टाऊन आणि प्रसार माध्यमांमध्ये तनुश्री विरूद्ध नाना यांच्यातील वाद रंगत आहे. नानाने आपली छेडछाड केल्याचा आरोप तिने लावला होता. त्यावर आता नानाने प्रत्युत्तर देत कायदेशीर पाऊल उचलले आहे. याबाबत नाना पाटेकर यांचे वकिल राजेंद्र शिरोडकर यांनी माहिती दिली.

नाना लवकरच मुंबईत परतणार 

नाना यांचे वकिल शिरोडकर यांनी सोमवारी तनुश्रीला नोटीस पाठवल्याचे सांगितले. त्यांनी म्हटले आहे की, तनुश्रीला पाठवण्यात आलेल्या नोटीसीमध्ये आम्ही त्यांनी लावलेल्या सर्व आरोपांना फेटाळले असून नाना पाटेकर यांनी बदमानी केल्यामुळे त्यांची माफी मागण्यात यावी असे नमूद केले आहे. याविषयी अधिक माहिती देणे आता योग्य होणार नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे. नाना पाटेकर सध्या राजस्थानमध्ये कामानिमित्त गेले असून ते लवकरच मुंबईत परतणार आहेत. त्यांनतर एक पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडतील, असे शिरोडकर म्हणाले.

- Advertisement -

काय आहे हा वाद 

१० वर्षांपूर्वी म्हणजेच २००८मध्ये ‘हॉर्न ओके प्लीज’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अभिनेते नाना पाटेकरांनी विनयभंग करण्याचा प्रयत्न केल्याचा दावा अभिनेत्री तनुश्री दत्ताने केल्यानंतर अवघ्या बॉलिवूड इंडस्ट्रीसोबतच मराठी चित्रपटसृष्टीमध्ये देखील खळबळ माजली. यावर राखी सावंत हिनेदेखी तनुश्रीला फटकारले असून काही बॉलीवूड कलाकारांनी मात्र तनुश्रीला पाठिंबा दर्शवला आहे. आज तनुश्रीने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावरही धमकावल्याचे आरोप लावले आहे. तर तनुश्री हे सर्व वादात राहून प्रसिद्धी मिळवण्यासाठी करत असल्याचे म्हटले जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -