इस्रायलचे राजदूत नाओर गिलोन यांनी IFFIच्या परीक्षकाचे टोचले कान

सध्या गोव्यात सुरु असणारा ‘इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया’ चांगलाच चर्चेत आहे. यामध्ये IFFI 2022 चे प्रमुख परिक्षक नदव लॅपिडने या चित्रपट महोत्सवात ‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपटावर निशाणा साधला होता. तसेच या चित्रपटाबाबत काही वादग्रस्त वक्तव्य देखील केली. त्यानंतर सोशल मीडियावर नेटकरी त्यांच्या टीका करु लागले आहेत. दरम्यान, या प्रकरणावर भारतामधील इस्रायलचे प्रतिनिधित्व करणारे नाओर गिलोनने देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. नाओर गिलोनने इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडियाचे प्रमुख परिक्षक नदव लॅपिड यांचे वक्तव्य वैयक्तिक असल्याचे सांगितले.

खरंतर, गोव्यामध्ये आयोजित करण्यात आलेल्या 53 व्या फिल्म फेस्टिव्हलमध्ये नदव लॅपिडने ‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपट एका विशिष्ट विचारांचा प्रचार करणारा आणि असभ्य असून एवढ्या मोठ्या महोत्सवात या चित्रपटाला स्थान मिळणं चूकीचं आहे. असं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं.

आता याचं वक्तव्यावर भारतात नदव लॅपिडवर टीका केली जात आहे. दरम्यान, भारतामध्ये इस्रायलचे प्रतिनिधित्व करणारे नाओर गिलोन यांनी नदव लॅपिडला द काश्मीर फाईल्सवर टीका केल्या प्रकरणी ट्वीटरुन पत्र लिहिलं आहे. त्यात त्यांनी लिहिलंय की, हे भारतीयांना समजावं म्हणून मी हे हिब्रू भाषेत लिहित नाही. त्यांनी निदव लॅपिडची शाळा घेत लिहिलंय की, “तुम्हाला लाज वाटायला हवी. भारतीय संस्कृतीमध्ये पाहूणा देवासारखा असतो. तुम्ही IFFI Goa मध्ये प्रमुख परिक्षण करण्यासाठी आमंत्रित करण्यात आलं होतं. मात्र, तुम्ही त्यांचा विश्वास, उत्साह, आदर सर्वच गोष्टींचा अपमान केला. आमच्या भारतीय मित्रांनी भारतामध्ये इस्त्रायलबद्दल प्रेम दाखवण्यासाठी आपल्याला बोलावले होते. त्यांनी तुम्हाला एक इस्रायली आणि मला इस्रायलचे प्रतिनिधित्व करणारा म्हणून आमंत्रित करण्यात आलं.”

तसेच ते पुढे म्हणाले की,”आम्ही व्यासपीठावरुन दोन्ही देशांच्या नात्याची आणि समानतेची चर्चा केली. व्यासपीठावरुन भारताचे मंत्री आणि मी म्हटलं की दोन्ही देशांमध्ये समानता आहे. आपण एकसारख्या शत्रूंसोबत लढू शकतो. आपले शेजारी दृष्ट आहेत.”

 


हेही वाचा :

‘द काश्मीर फाईल्स’ व्हल्गर चित्रपट… IFFIच्या परीक्षकांची टीका