घरताज्या घडामोडी'बॉलिवूड कलाकारांची नार्को टेस्ट केली तर', कंगणाचे पुन्हा धक्कादायक वक्तव्य!

‘बॉलिवूड कलाकारांची नार्को टेस्ट केली तर’, कंगणाचे पुन्हा धक्कादायक वक्तव्य!

Subscribe

अभिनेत्री कंगना रणावत नेहमीच आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत असते. अभिनेता सुशांत सिंग राजपुतच्या आत्महत्येनंतर तर कंगनाने बॉलिवूडच्या कलाकारांवर बोलण्याची एकही संधी सोडली नाहीये. ती कधी काय बोलेल हे कोणीच सांगू शकत नाही. या प्रकरणात तीच्या या वक्तव्यामुळे पोलिसांची तपासाची दिशाही बदलली आहे. आता या प्रकरणात ड्रग Angel समोर आला आहे. त्यामुळे एक नवा वाद सुरू झाला आहे. त्यामुळे कंगनाने पुन्हा एकदा बॉलिवूडकरांना लक्ष केलं आहे.

- Advertisement -

बॉलिवूडमध्ये नॉर्कोटेस्टची चाचणी केली तर बरेच सेलेब्रेटी तुरूंगात जातील असं कंगनाने म्हटलं आहे. तीने ट्वीट करत हे विधान केलं आहे. यावेळी तीने PMOIndia ला टॅग केलं आहे. जर बॉलिवूडच्या या सेलेब्रेटींची रक्ताची चाचणी केली तर बरेच मोठे खुलासे होतील. क्लीन इंडिया मिशन अंतर्गत बॉलीवूडच्या या गटाराची स्वच्छतादेखील करावी. असं तीने ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

आता कंगनाच्या या विधानाचं फारसं कोणाला आश्चर्य वाटलेलं नाहीये. कारण एखादी घटना घडल्यावर त्यावर कंगना काहीतरी बोलणार याची आता सवय झाली आहे. कारण काही घडलं की कंगना बॉलिवूडमधील एका ठराविक ग्रुपला टार्गेट करते. याआधीही कंगनाने बरीच मोठी विधाने केली आहेत. पण पण आता हे विधान नक्कीच नवीन वाद निर्माण करू शकेल. कंगनाने बॉलिवूडच्या मोठ्या स्टार्सवर नाव न घेता आरोप केले आहेत.

- Advertisement -

हे ही वाचा – करिना नंतर शाहीद कपूरच्या घरी देखील Good News; मीराने शेअर केला फोटो!


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -