घरमनोरंजनआर. माधवनच्या 'रॉकेट्री: द नंबी इफेक्ट'चे नरेंद्र मोदींकडून कौतुक

आर. माधवनच्या ‘रॉकेट्री: द नंबी इफेक्ट’चे नरेंद्र मोदींकडून कौतुक

Subscribe

शास्त्रज्ञ एस. नंबी नारायण यांच्य जीवनावर आधारित या चित्रपटाची कथा आहे. अभिनेता आर. माधवन या चित्रपटात मुख्य भूमिका साकारत असून त्यानेच चित्रपटाचे दिग्दर्शन सुद्धा केले आहे.

‘रहना है तेरे दिलमें’ फेम अभिनेता आर. माधवनचा आगामी चित्रपट ‘रॉकेट्री: द नंबी इफेक्ट’ची सर्वत्र चर्चा होत आहे. भारतीय अवकाश संशोधन संस्थेतील (इस्त्रो) शास्त्रज्ञ एस. नंबी नारायण यांच्य जीवनावर आधारित या चित्रपटाची कथा आहे. अभिनेता आर. माधवन या चित्रपटात मुख्य भूमिका साकारत असून त्यानेच चित्रपटाचे दिग्दर्शन सुद्धा केले आहे. या बहुप्रतिक्षित चित्रपटासाठी आर. माधवनचे अनेक स्तरावरुन कौतुक होत आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या चित्रपटाची दखल घेतली आहे. सोमवारी आर. माधवन आणि शास्त्रज्ञ एस. नंबी नारायण पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटले होते. त्यानंतर ‘रॉकेट्री: द नंबी इफेक्ट’ या चित्रपटाबात मोदींनी एक ट्विट केले, ”आर. मधवन आणि प्रतिभावंत नंबी नारायण यांना भेटून मला आनंद झाला. या चित्रपटात एक महत्तपपूर्ण विषय आहे जो लोकांनी माहित करुन घेतला पाहिजे. आपल्या शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञांनी देशासाठी महान बलिदान दिले आहे. ज्याची झलक रॉकेट्री च्या क्लीपमध्ये दिसली.”

यानंतर आर. माधवनने नरेंद्र मोदी यांच्य ट्विटला प्रतिक्रिया देत त्यांचे आभार मानले. सोबतच मीटिंगचा फोटोही प्रेक्षकांसोबत शेअर केला.

 

View this post on Instagram

 

A post shared by R. Madhavan (@actormaddy)

- Advertisement -

 हा चित्रपट हेरगिरीच्या खोट्या आरोपाखाली तुरंगात गेलेल्या एरोस्पेस अभियंता नंबी नारायणन यांचा जीवनप्रवास स्पष्ट करतो. या चित्रपटात आर. माधवन याने नबी यांची प्रमुख भूमिका साकारली आहे. हा चित्रपट हिंदी, तेलुगु, मल्यालम, तमिळ, इंग्रजी आणि कन्न भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.


हे वाचा-  फोर्ब्स च्या जगातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत किम कार्दशियनची वर्ण

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -