गेल्या काही दिवसांपासून कलाविश्वात लगीनसराई सुरु आहे. अनेक सेलिब्रिटी मंडळी लग्नबंधनात अडकताना दिसतायत. ज्यामध्ये आता एका बॉलिवूड अभिनेत्रीची भर पडली आहे. 2011 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘रॉकस्टार’ सिनेमात रणबीर कपूर आणि नर्गिस फाखरी झळकले होते. दोघांची रोमँटिक केमिस्ट्री प्रेक्षकांना फार आवडली होती. या सिनेमातून प्रकाशझोतात आलेल्या नर्गिस फाखरीच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. नुकतेच तिने गुपचूप पद्धतीने लग्न उरकल्याचे समजत आहे. (Nargis Fakhri Secret Wedding inside photos goes viral)
सोशल मीडियावर फोटो व्हायरल
अभिनेत्री नर्गिस फाखरीचा चाहता वर्ग फार मोठा आहे. त्यामुळे सोशल मीडियावर तिला फॉलो करणाऱ्यांची संख्या देखील चांगलीच मोठी आहे. नर्गिसने अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर स्टोरीमध्ये काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. ज्यामध्ये नर्गिससोबत तिचा बॉयफ्रेंड टोनी दिसतोय. दरम्यान, रेडिटवरदेखील काही फोटो व्हायरल होताना दिसत आहेत. जे नर्गिसच्या वेडींगमधले इनसाईड फोटो असल्याचं बोललं जातंय. मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेत्री नर्गिस फाखरीने तिचा बॉयफ्रेंड टोनी बीजसोबत गुपचूप पद्धतीने लग्न केलं आहे.
कॅलिफोर्नियात एका महागड्या हॉटेलमध्ये त्यांचं सिक्रेट वेडिंग पार पडल्याचं समजतंय. मोजक्या लोकांच्या उपस्थित हा लग्न सोहळा पार पडला असून आता हे नवं जोडपं स्वित्झर्लंडमध्ये हनिमून एन्जॉय करण्यासाठी गेल्याचे समोर आले आहे. दोघांनीही इंस्टाग्राम स्टोरीवर स्वित्झर्लंडमधील फोटो, व्हिडीओ शेअर करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. हे फोटो पाहून नर्गिसच्या चाहत्यांना तिने लग्न उरकल्याचे संकेत मिळाले आहेत. अद्याप अभिनेत्री नर्गिस फाखरीने आपल्या लग्नाबाबत अधिकृत घोषणा केलेली नाही. मात्र, सोशल मीडियावर चाहत्यांकडून तिच्या लग्नाबाबत आनंद व्यक्त केला जात आहे.
अभिनेत्री नर्गिस फाखरी मूळ अमेरिकन असून ती अभिनेता रणबीर कपूरसोबत ‘रॉकस्टार’ सिनेमात झळकली होती. दोघांच्या रोमँटिक केमिस्ट्रीने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते. याशिवाय ‘मद्रास कॅफे’, ‘फटा पोस्टर निकला हीरो’, ‘मैं तेरा हीरो’, ‘सागसम’, ‘अजहर’, ‘ढिशूम’ या सिनेमात ती झळकली होती. आता लवकरच ती ‘हाऊसफुल 5’मध्ये दिसणार आहे. तर नर्गिसचा लाईफ पार्टनर टोनी बेग हा मूळ काश्मीरचा आहे. तो एक यशस्वी उद्योजक आणि इन्व्हेस्टर आहे. गेल्या 3 वर्षांपासून तो आणि नर्गिस डेट करत होते.
हेही पहा –
Mere Husband Ki Biwi : मेरे हसबंड की बीवी सिनेमाला प्रेक्षकांची पसंती