Friday, June 18, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर मनोरंजन संचारबंदीत इव्हिनिंग वॉकला निघालेल्या नसीरुद्दीन शाह यांना पोलिसांनी अडवलं

संचारबंदीत इव्हिनिंग वॉकला निघालेल्या नसीरुद्दीन शाह यांना पोलिसांनी अडवलं

Related Story

- Advertisement -

बॉलिवूडचा दिग्गज अभिनेता नसीरुद्दीन शाह आपल्या फिटनेसबाबत खूप सतर्क आहे. अशा परिस्थितीत अभिनेता मुंबई शहरातील सामान्य लोकांप्रमाणे आठवड्यातून किमान दोन किंवा तीन वेळा इव्हिनिंग वॉकसाठी घराबाहेर पडले होते. मात्र त्यांना मुंबई पोलिसांकडून अडवण्यात आले आणि त्यांनी यू-टर्न घेण्यास भाग पाडले. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता मुंबईत सुरू असलेल्या लॉकडाऊन निर्बंधांदरम्यान पोलिसांनी नसीरुद्दीन शहा यांना घरी परतण्यास सांगितले. या प्रसंगाचा व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर सध्या चांगलेच व्हायरल होत असून नेटकरी त्यांवर आपल्या प्रतिक्रिया देताना दिसताय.

ईटाइम्सच्या वृत्तानुसार, बुधवारी नसीरुद्दीन शाह जेव्हा संध्याकाळी फिरण्यासाठी घराबाहेर गेले होते, तेव्हा मुंबई पोलिसांनी त्यांना कोरोना संसर्गादरम्यान घराबाहेर पडू नका असे निर्देश दिले, त्यानंतर या अभिनेत्याने यू टर्न घेतला. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांकडून सांगण्यात आल्यानंतर आणि प्रोटोकॉलचे पालन केल्याचे कारण देऊन नसीरुद्दीन शहा यांनी कोणताही संकोच न करता ते आपल्या घराकडे वळाले.

 

View this post on Instagram

 

A post shared by ETimes (@etimes)

- Advertisement -

या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर जोरदार शेअर केला जात आहे. नसीरुद्दीन आठवड्यातून दोन ते तीन वेळा फिरायला बाहेर पडतात. परंतु, कोरोना विषाणूच्या संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी राज्य सरकारने मुंबईत लॉकडाऊन लादले आहे. तसेच यादरम्यान, वृद्धांना घराबाहेर न पडण्याचा सल्ला देण्यात येत आहे. अशा परिस्थितीत पोलिसांनी नसीरुद्दीन शाह यांना घरी परत जाण्याचे आवाहन केले. पापाराझीने ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन यांनी पाली हिलवर चालताना पाहिले. यावेळी नसीरुद्दीन यांनी पांढरा टी-शर्ट आणि तपकिरी रंगाचे बूट आणि स्काय ब्लू पँटमध्ये दिसले. या दरम्यान शहरातील रस्त्यावर फिरताना नसीरुद्दीन शाह यांचा फोटो क्लिक करण्यात आला आणि यासह त्यांचा व्हिडिओ देखील काढण्यात आला.

- Advertisement -

 

- Advertisement -