बॉलिवूड कलाकार काजोल आणि अजय देवगण यांची मुलगी न्यासा ही आता चर्चेत असते. कधीकधी पब्लिक अपीयरेंसच्या कारणास्तव असो किंवा पार्टीच्या कारणामुळे. खरंतर आता ती आपल्या वाढदिवसामुळे अधिक चर्चेत आली आहे. खरंतर न्यासाचा २० वा वाढदिवस आहे. तिच्या आई-वडिलांनी तिच्यासाठी इंस्टाग्रामवर एक खास पोस्ट शेअर केली आहे. त्यात तिला दोघांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
काजोलने NMACC लॉन्च दरम्यान एक फोटो पोस्ट केला आहे. यामध्ये त्या दोघी अत्यंत सुंदर दिसून येत आहेत. कॅप्शनमध्ये अभिनेत्रीने मुलीच्या वाढदिवसानिमत्त असे लिहिले आहे की- हे आम्ही आहोत आणि ही आमची नेहमीच कथा आहे. तुझा सेंसर ऑफ ह्युमर आणि तुझी बुद्धिमत्ता फार आवडते. तु माझ्या हृदयाच्या अगदी जवळ आहे. माझ्या लगान बेबी गर्लसाठी खुप प्रेम. तु नेहमीच हसत रहा.
View this post on Instagram
तर अजयने आपल्या पोस्टमध्ये असे लिहिले आहे की, फादर ऑफ प्राइड. हॅप्पी बर्थडे बेबी. अजयने शेअर केलेल्या फोटोंमध्ये ते दोघे ही सुंदर दिसत आहेत.
View this post on Instagram
न्यासाने सिंगापुर मध्ये ग्लिओन इंस्टीट्युट ऑफ हायर एज्युकेशन पूर्ण केल्यानंतर पुढील शिक्षणासाठी स्विर्त्झलँन्डला गेली होती. येथून काही महिन्यांपूर्वीच ती येथे आली आहे. सध्या ती तिच्या मित्रपरिवारासोबत पार्टीत दिसून येत असते.
हेही वाचा: यंदाचा ‘लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार’ आशा भोसलेंना जाहीर