घरमनोरंजननाथ प्रतिष्ठानच्या गणेशोत्सवाला अमिषा पटेलसह मराठी पडद्यावरील अनेक कलाकारांची उपस्थिती

नाथ प्रतिष्ठानच्या गणेशोत्सवाला अमिषा पटेलसह मराठी पडद्यावरील अनेक कलाकारांची उपस्थिती

Subscribe

परळी : संपूर्ण राज्यात गाजलेल्या नाथ प्रतिष्ठानच्या वैद्यनाथ सार्वजनिक गणेश महोत्सवाचा शुभारंभ 13 सप्टेंबर रोजी होणार आहे. यावेळी अभिनेत्री अमिषा पटेल आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांची प्रमुख उपस्थिती यावेळी आहे. महोत्सवाचे हे 13 वे वर्ष असून या गणेश उत्सव काळातील दहा दिवसात विविध सांस्कृतिक, सामाजिक, प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे.

गुरुवारी सायंकाळी 7 वाजता मोंढा मैदान येथे अभिनेत्री अमिषा पटेल हिच्या हस्ते महोत्सवाला सुरुवात होणार आहे. उद्घाटन कार्यक्रमानंतर सिनेतारका संस्कृती बालगुडे, वैशाली जाधव, पूजा पाटील आणि पुनम कुडाळकर यांचा ‘तुमच्यासाठी काय पण’ हा लावण्यांचा कार्यक्रम होणार आहे. या गणेश महोत्सवात चला हवा येऊ द्या फेम भाऊ कदम, सुप्रसिद्ध नृत्यांगना सपना चौधरी, सिनेतारका मानसी नाईक, मेघा घाडगे, भार्गवी चिरमुले, हेमांगी कवी, मराठी चित्रपट सृष्टीतील संजय नार्वेकर, सुप्रसिध्द गायक आदर्श शिंदे यांच्याही कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

- Advertisement -

तसेच सुप्रसिध्द कव्वाल मुस्तबा अजिज नाना प्रस्तुत कव्वाली मुकाबला कार्यक्रमही होणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -