मुंबई : नुकतेच 69 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार गुरुवारी सायंकाळी जाहीर करण्यात आले. या राष्ट्रीय पुरस्कारात मराठी चित्रपट ‘गोदावरी (दि होली वॉटर)’ या चित्रपटाच्या दिग्दर्शनाकरिता निखिल महाजन यांना उत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार, ‘एकदा काय झालं’ या सलील कुलकर्णी दिग्दर्शित चित्रपटाला उत्कृष्ट मराठी चित्रपट तर दिग्दर्शक शेखर बापू रणखांबे यांच्या ‘रेखा’ चित्रपटाला परीक्षकांचा विशेष पुरस्कार मिळाला आहे. ‘द काश्मिर फाईल्स’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ठ सहाय्यक अभिनेत्री म्हणून पल्लवी जोशी यांना मिळणार आहे.
मराठी चित्रपटला मिळलेल्या पुरस्कारानंतर राज्याच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्वीट करत अभिनंदन केले आहे. मुख्यमंत्री ट्वीटमध्ये म्हणाले, “राष्ट्रीय स्तरावर प्रतिभेची मोहोर उमटवण्याची आपल्या चमकदार कामगिरीची पंरपरा यंदाही मराठी चित्रपट क्षेत्राने कायम राखली आहे, याचा अभिमान आहे.”
हेही वाचा – राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2023: ‘एकदा काय झालं’ सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट, पाहा विजेत्यांची यादी
फिचर फिल्म कॅटेगिरीतील पुरस्कारांची घोषणा…
- सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म- रॉकेट्री: द नंबी इफेक्ट
- सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शन- पुष्पा / आरआरआर
- सर्वोत्कृष्ट मेकअप आर्टिस्ट- गंगुबाई काठियावाडी
- सर्वोत्कृष्ट कॉस्च्युम डिझायनर- सरदार उधम सिंह
- सर्वोत्कृष्ट प्रॉडक्शन डिझायनर- सरदार उधम सिंह
- सर्वोत्कृष्ट एडिटिंग- गंगुबाई काठियावाडी
- सर्वोत्कृष्ट अॅक्शन डायरेक्टर पुरस्कार- RRR
- सर्वोत्कृष्ट सिनेमेटोग्राफी- सरदार उधम सिंह
- सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता- पंकज त्रिपाठी
- सर्वोत्कृष्ट बालकलाकार- भाविन रबारी
- सर्वोत्कृष्ट अभिनेता- अल्लू अर्जून
- सर्वोत्कृष्ट अभिनेत्री- आलिया भट्ट
- सर्वोत्कृष्ट अभिनेत्री- कृती सेनन
- सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन – निखिल महाजन
- विशेष ज्युरी पुरस्कार- शेरशाह
- राष्ट्रीय एकात्मतेवरील सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट नर्गिस दत्त पुरस्कार- द काश्मीर फाइल्स
- सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट- सरदार उधम सिंह
- सर्वोत्कृष्ट गुजराती चित्रपट- छेल्लो शो
- सर्वोत्कृष्ट कन्नड चित्रपट- 777 चार्ली
- सर्वोत्कृष्ट मैथिली चित्रपट- समांतर
- सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट- एकदा काय झालं
- सर्वोत्कृष्ट मल्याळम चित्रपट- होम
- सर्वोत्कृष्ट तमिळ चित्रपट- Kadaisi Vivasayi
हेही वाचा – ‘गंगूबाई काठियावाड़ी’ साठी आलियाने पटकावला राष्ट्रीय पुरस्कार
नॉन फिचर फिल्म कॅटेगिरीमधील पुरस्कार
- बेस्ट नरेशन वॉइज ओवर आर्टिस्ट- Kulada Kuma Bhattacharjee
- बेस्ट म्युझिक डायरेक्शन- इशान दिवेचा
- बेस्ट एडिटिंग- अभरो बनर्जी (If memory serves me Right)
- बेस्ट फिल्म ऑन फॅमिली व्हॅल्यू- चंद सासे
नॉन फिचर स्पेशल मेंशन
- बाले बंगारा- अनिरुद्ध जाटेकर
- Karuvarai- श्रीकांत देवा
- द हिलिंग टच- श्वेता कुमार दास
- एक दुआ- राम कमल मुखर्जी