अंडरवेअरच्या जाहिरातीमुळे रश्मिका मंदना ट्रोल, फॅन्स म्हणाले तुझ्याकडून…

national crush rashmika mandanna troll on her latest underwear ad with vicky kausal
अंडरवेअरच्या जाहिरातीमुळे रश्मिका मंदना ट्रोल, फॅन्स म्हणाले तुझ्याकडून...

‘नॅशनल क्रश’ म्हणून दाक्षिणात्य फिल्म इंडस्ट्रीतील अभिनेत्री राश्मिका मंदानाला ओळखले जाते. साऊथची अभिनेत्री रश्मिका नेहमी तिच्या हटके स्टाईल आणि चित्रपटांमुळे चर्चेत असते. मात्र यावेळी ती चित्रपटामुळे नव्हे तर अभिनेता विकी कौशलसोबतच्या एकाच्या एका जाहिरातीमुळे चर्चेचा विषय ठरलीय. ही एका कंपनीच्या अंडरविअरची जाहिरात आहे. यामध्ये रश्मिका अभिनेत्याच्या या अंडरगारमेंटवर फिदा झाल्याचे दाखवण्यात आले आहे. मात्र या जाहिरातीमुळे रश्मिकाला जोरदार ट्रोल केलं जात आहे. अनेक चाहत्यांनी तुझ्याकडून अशी अपेक्षा नव्हती अशी म्हणत सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्याविरोधात टीका सुरु आहे.

या जाहिरातीमध्ये रश्मिका योगासने शिकवताना दिसत आहे. यावेळी योगा करताना तिची नजर विकीच्या अंडरगारमेंटकडे जाते. विकी कौशलच्या अंडरगारमेंटची स्ट्रीप पाहून अभिनेत्री रोमँटिक होते. अशा आशायाची ती जाहिरात आहे. मात्र ही जाहिरात अगदी चीप असल्याचे म्हणत रश्मिकावर टीकांचा भडीमार सुरु आहे. रश्मिकाला अशा जाहिरातीत पाहून सोशल मीडियावर चाहत्यांकडून तिला खडेबोल सुनावले जात आहे.

एका चाहत्याने लिहिलं की, ‘रश्मिका मंदना तुझी जाहिरात पाहून खूप निराशाजनक वाटले. मला तुझ्याकडून अशी अपेक्षा नव्हती. तु एक नॅशनल क्रश असल्याने तुला भान ठेवून वागायला हवे. लाखो चाहते तुझ्यावर प्रेम करतात.’

तर दुसऱ्या एका चाहत्याने म्हटले की, ‘भारताची नॅशनल क्रश रश्मिका मंदना आणि विकी कौशल यांनी जाहिरातीतून नैतिक मूल्ये, तत्त्वे, शिष्टाचारांचा विचार न होता केवळ पैशांसाठी ही जाहिरात केली आहे.’

दरम्यान विकी कौशलच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झाल्यास, विकी कौशल लवकरचं आगामी सरदार उधम सिंग, साम बहादूर आमि मिस्टर लेलेसह अनेक चित्रपटांमध्ये झळकणार आहेत. यासोबतचं अभिनेत्री रश्मिका मंदाना अल्लू अर्जुनसोबत ‘पुष्पा’, ‘मिशन मजनू’ आणि सिद्धार्थ मल्होत्रासोबत ‘अलविदा’ या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.