घरमनोरंजन'नॅशनल क्रश' रश्मिका होणार McDonalds इंडियाची ब्रॅण्ड एम्बेसेडर

‘नॅशनल क्रश’ रश्मिका होणार McDonalds इंडियाची ब्रॅण्ड एम्बेसेडर

Subscribe

दक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदानाने तिच्या अभिनेयाने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. रश्मिकाचे चाहते फक्त दक्षिणेमध्येच नाहीतर संपूर्ण देशात आहे. सोशल मीडियावरही तिचा मोठा चाहतावर्ग आहे. तिचे सोशलमीडियावर असंख्य फॉलोअर्स असण्यासोबत फक्त इन्स्टाग्रामवर १५ मिलियनपेक्षा अधिक फॉलोअर्स आहेत. सोशल मीडियावर ती नेहमी तिचे ग्लॅमर फोटो शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. अल्पवधीतच ती तरुणाईची आयकॉन बनली आहे. आता या नॅशनल क्रशची मॅकडॉनल्ड इंडियाने ब्रॅण्ड अॅम्बेसेडर म्हणून निवड केलीा आहे. याबाबत तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ”आता मी मॅक्डोनल्डच्या फॅमचा भाग आहे.” ‘मॅकडॉनल्ड हा बालपणापासून माझा आवडता ब्रॅण्‍ड राहिला आहे. मी कॉलेजमध्‍ये असताना फूडसाठी मॅकडॉनल्ड्सवरच अवलंबून राहिले. ते माझ्याकडे या सहयोगासाठी आले तेव्‍हा मला खूपच आनंद झाला. तसेच ग्राहकांना उत्तम दर्जाचे स्‍वादिष्‍ट फूड देणाऱ्या ब्रॅण्‍डचे प्रति‍निधित्‍व करण्‍याचा मला आनंद होत आहे. असे ती त्यात म्हणाली आहे.

 

- Advertisement -

 या सहयोगाच्‍या घोषणेबाबत बोलताना मॅकडॉनल्ड इंडियाच्‍या (पश्चिम व दक्षिण) मार्केटिंग व कम्‍युनिकेशन्‍सचे संचालक अरविंद आरपी म्‍हणाले, ‘आम्‍हाला रश्मिकाची ब्रॅण्‍ड अॅम्बेसिडर म्‍हणून निवड करण्‍याचा आनंद होत आहे. ती असंख्य चाहत्यांसाठी लोकप्रिय युथ आयकॉन आहे.”नॅशनल क्रश’ म्‍हणून लोकप्रिय असलेल्‍या रश्मिकाने विविध प्रसंगी तिच्‍या सोशल मीडियाच्‍या माध्‍यमातून खाद्यपदार्थांप्रती प्रेम व्‍यक्‍त केले आहे. रश्मिका प्रमुख ब्रॅण्‍ड मोहिमांचा भाग असणार आहे आणि प्रमुख बाजारपेठांमध्‍ये मॅकडॉनल्डसाठी ब्रॅण्‍डबद्दल लोकांमध्ये प्रेम वाढवण्‍यामध्‍ये प्रमुख भूमिका बजावेल.

 रश्मिका दक्षिण भारतातील राज्यांमध्ये अत्यंतर लोकप्रिय आहे. तिने तेलुगु व कन्नड चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांना आपलेसे केले आहे. यासोबतच आता ती ‘गूड बाय’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्येही पदार्पण करणार आहे.

- Advertisement -

हे वाचा-  ”राजकारण जगाला लागलेली सगळ्यात मोठी कीड”, लसीच्या राजकारणावर तेजस्विनी पंडितची टीका

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -