घरमनोरंजनअभिनेते, लेखक वीरा साथीदार यांचे निधन

अभिनेते, लेखक वीरा साथीदार यांचे निधन

Subscribe

विचारवंत लेखक, अभिनेते वीरा साथीदार यांचे निधन झाले. कोरोना संसर्गाशी झुंज देताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
आठ दिवसांपूर्वी साथीदार यांना कोरोनाची लागण झाली होती. दरम्यान गेली पाच दिवसांपासून रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. वीरा साथीदार यांनी १९ मार्चला करोना प्रतिबंधात्मक लस घेतली होती. मात्र १० दिवसानंतर ते करोना संक्रमित झाले. आज सकाळी एम्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

२०१७ मध्ये प्रदर्शित झालेला ‘कोर्ट’ सिनेमातील त्यांची भूमिका गाजली होती. अभिनयाच्या पहिल्याच प्रयत्नाला साथीदार यांना कौतुकाची थाप मिळाली. भारताकडून या सिनेमाला ऑस्करसाठी नामांकित करण्यात आले होते. वीरा साथीदार यांनी ‘कोर्ट’ सिनेमात पहिल्यांदा आपली अभिनय कला आजमावली केला. सर्वश्रेष्ठ परदेशी भाषेतील सिनेमा (बेस्ट फॉरेन फिल्म) म्हणून ‘कोर्ट’ सिनेमाला ऑस्कर नामांकन देण्यात आले. शिवाय सिनेमातील वीरा साथीदार यांच्या अभिनयालाही अनेकांनी दाद दिली. ६२ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारातही चित्रपटाला ‘सुवर्णकमळा’ हा सर्वोच्च बहुमान मिळाला.

- Advertisement -

वर्धा जिल्ह्यातील असलेले वीर साथीदार हे नागपूरच्या जोगीनगर येथील गरीब कुटुंबात लहानाचे मोठे झाले. अशा हलाखीच्या परिस्थितीतही आईने त्यांनी शिकवण्याची नवी उर्जा दिली. वीर यांचे वडील रेल्वे स्थानकावर हमालीचे काम करायचे, तर आई बांधकाम मजूर म्हणून काम करत होती. दरम्यान वीरा साथीदार यांच्यांवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा पगडा होता. त्यांनी पत्रकार म्हणूनही अनके वर्षे काम केले. पत्रकार म्हणून काम करताना त्यांनी शोषित-पीडितांना न्याय देण्यासाठी मोठा संघर्ष केला. ते एक गीतकारही काम करत होते. आंबेडकर चळवळीतील अनेक गाणीही त्यांनी गायली आहेत. दरम्यान विविध राज्यांमध्ये आजपर्यंत त्यांनी अनेक व्याख्यानमाला घेतल्या. यातील अनेक व्याख्याने विशेष गाजली होती. त्यांनी ‘विद्रोही’ नावाच्या मासिकाचे संपादन केले. तसेच ‘रिपब्लिकन पँथर’ संघटनेच्या माध्यमातून ते वंचितांसाठी काम करत होते.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -