Tuesday, June 6, 2023
27 C
Mumbai
घर ट्रेंडिंग National Hugging Day 2022: बॉलिवूड सिनेमातील 'हे' 6 बेस्ट Hug सीन्स...

National Hugging Day 2022: बॉलिवूड सिनेमातील ‘हे’ 6 बेस्ट Hug सीन्स पाहिलेत का?

Subscribe

मागच्या काही वर्षात बॉलिवूडमध्ये देखील ऑन स्क्रिन हग सीन्स दाखवण्याचे प्रमाण वाढले आहे. अनेक बॉलिवूड सिनेमांमध्ये थॅक्यू म्हणण्यासाठी प्रेम व्यक्त करताना काही गोड हग सीन्स पहायला मिळतात.

आपल्या जवळच्या एखाद्या व्यक्तीला आलिंगन देणे किंवा मिठी मारणे ही फार गोड भावना आहे. एखाद्याची काळजी, प्रेम व्यक्त करण्यासाठी त्याला मिठी किंवा आलिंगन दिले जाते. मागच्या काही वर्षात बॉलिवूडमध्ये देखील ऑन स्क्रिन हग सीन्स दाखवण्याचे प्रमाण वाढले आहे. अनेक बॉलिवूड सिनेमांमध्ये थॅक्यू म्हणण्यासाठी प्रेम व्यक्त करताना काही गोड हग सीन्स पहायला मिळतात. आज राष्ट्रीय आलिंगन दिवस आहे. 21 जानेवारीला नॅशनल हग डे साजरा केला जातो. आज हग डे निमित्त बॉलिवूड सिनेमातील 6 अविस्मरणीय हग सीन्स कोणते आहेत पाहूयात.

दिलवाले दुल्हनिया ले जायेगे

- Advertisement -

शाहरुख खान, काजोल या रोमँटीक जोडीचा दिल वाले दुल्हनिया ले जायेंगे या सिनेमातील हग सीन आजही सर्वांच्या लक्षात आहे मोहरीच्या शेतात एकमेकांना बिनधास्त मिठी मारणारा हा हग सीन सर्वाधिक लोकप्रिय झाला.

तारे जमीन पर

- Advertisement -

सहानुभूती आणि दुसऱ्याप्रती चांगल्या भावना व्यक्त करणारा आमिर आणि ईशानचा तारे जमीनपर मधील हग सीन. शिक्षक आणि विद्यार्थ्याचे निर्मळ नाते या सीनमध्ये दिसले होते. या हग सीनने सर्वांचे मन जिंकले होते.

 

बजरंगी भाईजान

सिनेमातील हरवलेली मुन्नी सापडल्यानंतर सलमान खान आणि मुन्नी एकमेकांच्या हग करतात. या हग सीनने सर्वांच्या डोळ्यात पाणी आणले होते.

रंग दे बसंती

रंग दे बसंती हा सर्वांचाच लाडका सिनेमा आहे. एका सीनमध्ये सगळी पात्र एकत्र येतात आणि एआर रेहमानच्या रुबरो गाण वाजत आणि सर्व एकत्र येऊन हग करतात.

सिलसिला

सिनेमातील प्रसिद्ध हग सीन्समध्ये अभिनेता बिग बी आणि रेखा यांचे सीन्स आलेच. त्यांचे सर्वच ऑन स्क्रिन हग सीन्स अविस्मरणीय आहेत.

मोहब्बते

यश चोप्राच्या सिनेमातील ऐश्वर्या आणि शाहरुखची बेस्ट हग मुमेंट आजही प्रेक्षकांना आवडते.

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -