Monday, June 5, 2023
27 C
Mumbai
घर मनोरंजन हॉलिवूडच्या गाण्यांना टक्कर देत RRR चित्रपटातील 'नाटू नाटू' गाण्याने पटकावला 'गोल्डन ग्लोब...

हॉलिवूडच्या गाण्यांना टक्कर देत RRR चित्रपटातील ‘नाटू नाटू’ गाण्याने पटकावला ‘गोल्डन ग्लोब पुरस्कार’

Subscribe

साऊथ सुपरस्टार रामचरण आणि ज्यूनिअर एनटीआरच्या RRR चित्रपटाने आपली ताकद फक्त भारतीय बॉक्स ऑफिसवरच नाही तर संपूर्ण जगभरात दाखवली. या चित्रपटाने जगभरातील प्रेक्षकांच्या मनात मानाचे स्थान मिळवले. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटातील ‘नाटू नाटू’ गाण्याला ऑस्करमध्ये नामांकन मिळालं होतं. दरम्यान, आता समोर आलेल्या माहितीनुसार, या गाण्याला ‘गोल्डन ग्लोब पुरस्कार’ देण्यात आला आहे. या आनंदाच्या बातमीने संपूर्ण चित्रपटाच्या टीमसोबतच भारतीय प्रेक्षक देखील आनंदी झाले आहेत.

गोल्डन ग्लोब पुरस्कार कॅलिफॉर्नियामधील बवर्ली हिल्समध्ये असलेल्या बवर्ली हिल्टनमध्ये आयोजित करण्यात आला होता. ज्यामध्ये हॉलिवूडमधील अनेक नामवंत कलाकारांसोबत अनेक भारतीय कलाकार देखील सहभागी झाले होते. तसेच RRR चित्रपटाचा दोन विविध श्रेणींमध्ये नामांकित करण्यात आलं होतं. ज्यामध्ये नॉन इंग्लिश लॅंगव्हेज आणि बेस्ट ओरिजिनल सॉंग मोशन पिक्चर सहभागी होतं. तसेच त्यातलं नाटू नाटू हे गाणं 2022 मध्ये जगभरात गाजलं आणि सुपरहिट गाण्याच्या यादीत सहभागी झालं होतं.

- Advertisement -

हॉलिवूड गाण्यांना टक्कर

‘RRR’चित्रपटातील ‘नाटू नाटू’ गाण्यासोबतच ‘अवतार: द वे ऑफ वॉटर’ मधील ‘नथिंग इज लॉस्ट’, ‘ब्लँक पँथर: वकंडा फॉरएवर’ मधील ‘लिफ्ट मी अप’, ‘टॉप गन: मेवरिक’ मधील ‘होल्ड माय हँड’ यांसारख्या विविध 83 ट्यून्यसमधील 15 गाण्यांचा नामांकन म्हणून समावेश करण्यात आला होता. त्यातून ‘नाटू नाटू’ या गाण्याची सर्वोत्कृष्ट ओरिजनल गाणं या प्रकारात निवड करण्यात आली आहे.

- Advertisement -

 


हेही वाचा :

‘पठाण’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित, तासाभरात मिळाले मिलियन व्ह्यूज

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -