घरमनोरंजननवीन प्रभाकर खलनायकाच्या भूमिकेत

नवीन प्रभाकर खलनायकाच्या भूमिकेत

Subscribe

महाराष्ट्राला संतांची भूमी म्हणतात या भूमीला आपल्या ज्ञानाने पावन बनवणाऱ्या संतांमध्ये संत ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम आणि रामदास यांची नावे प्रमुख आहेत. ह्यामध्ये महाराष्ट्राचे दैवत असणाऱ्या शिवाजी महाराजांचे समकालीन समर्थ रामदास ज्यांना छत्रपतींनी स्वतःचे मित्र , तत्वज्ञ आणि मार्गदर्शक म्हणून निवडले होते. त्यांचे खरे नाव नारायण होते, परंतु त्यांनी स्वतःला रामदास म्हणजे रामाचा सेवक म्हणवून घेणे पसंत केले. दक्खन मध्ये जेव्हा मोठ्या प्रमाणात धार्मिक छळ व्हायच्या त्या काळात लोकांच्या विश्वासाचे रक्षण करण्यासाठी ज्यांनी भगवान श्रीरामांना आदर्श मानून “धर्म ही माणसाची सर्वात मौल्यवान संपत्ती आहे”, असा संदेश लोकांना दिला. त्याच समर्थ रामदास स्वामींच्या जीवनावर आधारित चित्रपट लवकरच रुपेरी पडद्यावर आपल्याला बघायला मिळणार आहे.

सिनेमास्टर्स एंटरटेनमेंट प्रस्तुत , समर्थ क्रिएशन्स निर्मित , डायनॅमिक प्रोडक्शन्स आणि आदित्यम क्रिएशन्स यांच्या संयुक्त विद्यमाने रामदास स्वामींवर आधारित चित्रपट ” रघुवीर ” लवकरच आपल्याला सिनेमागृहात बघायला मिळणार आहे. आणि महत्वाचे म्हणजे आपले लाडके कॉमेडियन नवीन प्रभाकर सुद्धा ह्यात फार महत्वाच्या भूमिकेत आपल्याला बघायला मिळणार आहेत. गायक , अभिनेता आणि कॉमेडियन अशी आपल्या मनोरंजन क्षेत्रातील वाटचाल करून “पैचान कौन” म्हणणारी ‘जुली – द बार गर्ल’ आणि ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर’ मधून घराघरात पोहोचलेले नवीन प्रभाकर ह्यांची नव्याने ओळख करून देण्याची गरज नाही.

- Advertisement -

अगदी काही आठवड्यांपूर्वीच आलेल्या श्रेयस तळपदे आणि मुक्ता बर्वे संदीप पाठक नंदू माधव कलाकारांची फौज असलेल्या “आपडी थापडी” या चित्रपटात सुद्धा खलनायकाच्या भूमिकेत अगदी सहज अभिनय करून मराठी सिनेमा मध्ये जबाबदारीने पाय रोवणाऱ्या कलाकारांच्या यादीत नवीन प्रभाकर यांनी स्वतःच स्थान पक्कं केलंय हे वेगळं सांगायला नकोच.

हल्लीच चित्रपट “सोहम” च्या निमित्ताने आपण नवीन ह्यांना काहीश्या हटके भूमिकेतही बघितले…
आता नव्याने येऊ घातलेल्या ” रघुवीर या मराठी सिनेमा मध्ये आपण नवीन प्रभाकरांना एका निगेटिव्ह भूमिकेत बघणार आहोत. कॉमेडियन म्हणून दिलखुलास हसवल्यानंतर एक गंभीर भूमिकेत सुद्धा प्रभाकरांनी चाहत्यांच्या मनावर छाप सोडली आता कॉमेडियन ते व्हिलन ह्या त्यांच्या प्रवासाचे साक्षीदार आपण बनणार आहोत.

- Advertisement -

हेही वाचा :

पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाच्या वडिलांना जीवे मारण्याची धमकी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -