घरमनोरंजन१९ वर्षांनंतर येतोय 'नवरा माझा नवसाचा २'

१९ वर्षांनंतर येतोय ‘नवरा माझा नवसाचा २’

Subscribe

मराठी चित्रपटसृष्टीतील जेष्ठ आणि दिग्गज अभिनेते सचिन पिळगावकर. त्यांचा अशी ही बनवाबनवी, गंमत जंमत, आयत्या घरात घरोबा असे अनेक चित्रपट सुपरहिट ठरले. त्यातील एक म्हणजे ‘नवरा माझा नवसाचा’ हा एव्हरग्रीन चित्रपट २००४ साली प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटाने जवळपास दोन दशकं चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. 19 वर्षापूर्वी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटातील प्रत्येक संवाद व गाणी प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. अशातच आता सचिन पिळगावकरांनी ‘नवरा माझा नवसाचा’ या चित्रपटाच्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.

तब्बल 19 वर्षांनी ‘नवरा माझा नवसाचा’ या चित्रपटाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटामध्ये नेमके कोण- कोण कलाकार दिसणार असा प्रश्न पडला होता. अशातच आता या चित्रपटाचे दिग्दर्शक आणि निर्माते सचिन पिळगावकर यांनी सोशल मीडियावर या चित्रपटाचे पोस्टर शेअर करत स्टारकास्टची यादी जाहीर केली आहे.

- Advertisement -

‘नवरा माझा नवसाचा २’ या चित्रपटाचे निर्माते-दिग्दर्शक सचिन पिळगावकर यांनी नुकताच आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर चित्रपटाचे मोशन पोस्टर शेअर केले आहे. या चित्रपटाचे मोशन पोस्टर शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, “१९ वर्षांनंतर येतोय ‘नवरा माझा नवसाचा २’ गणपती बाप्पा मोरया!’ या चित्रपटाच्या शूटिंगला आजपासून सुरूवात झाली आहे.”
सचिन पिळगावकर यांनी २००४ मध्ये ‘नवरा माझा नवसाचा’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. आता या चित्रपटाचा दुसरा भाग म्हणजेच ‘नवरा माझा नवसाचा २’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

 दरम्यान यात त्यांनी स्टारकास्टची नावं जाहीर केली आहे. या चित्रपटामध्ये सचिन पिळगावकर यांच्यासोबत ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, निवेदिता सराफ, सुप्रिया पिळगावकर, स्वप्नील जोशी, हेमल इंगळे, अली असगर, जयवंत वाडकर, निर्मिती सावंत, वैभव मांगले, सिद्धार्थ जाधव, संतोष पवार हे कलाकार या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हे सगळे दिग्गज कलाकार या चित्रपटाच्या माध्यमातून पुन्हा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाले आहेत.

- Advertisement -

‘नवरा माझा नवसाचा’ या चित्रपटातील गाजलेलं पात्र म्हणजे अशोक सराफ यांनी साकारलेला कंडक्टर. अशोक सराफ यांना नुकताच महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला. त्याबद्दल एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी या चित्रपटाच्या दुसर्‍या भागाचा उल्लेख केला. शिवाय आपणही याचा भाग असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे पुन्हा एकदा प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी अनुभवायला मिळणार आहे, यात शंका नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -